एसटीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मंचर- पुणे-नाशिक रस्त्यावरील (कळंब ता.आंबेगाव) येथील सहाणेमळयाजवळ शुक्रवार (दि. 27) दुपारी पावणे दोन वाजता एशियाड हिरकणी एसटी वाहनाने समोर चाललेल्या दुचाकीला ठोकर दिल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात ठार झालेल्यांमध्ये वैभव वासुदेव रामकर आणि आकाश अशोक जाधव यांचा समावेश आहे. आठवण खानावळीचे मालक वैभव वासुदेव रामकर (वय 25, राहणार कळंब) आणि आकाश अशोक जाधव (वय 19) हे दोघे (एमएच 14 जीएच 5631) या दुचाकीवरून गुरूपौर्णिमेनिमित्त ओझर येथुन गणपतीचे दर्शन घेवुन मंचर-अवसरीकडे येत होते. त्यावेळी कळंब गावाच्या हद्दीतील सहाणेमळयाजवळ अज्ञात एसटीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
अपघात स्थळावरून मंचर येथील रूग्णवाहिका चालक अमित काटे यांनी दोघांना मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मंचर उपजिल्हा रूग्णालयात उद्योजक नितीन भालेराव आणि उपसरपंच सचिन भालेराव यांनी संबंधितांच्या नातेवाईकांचे सात्वन केले. वैभव रामकर यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आठवण नावाचे हॉटेल आहे. तर मूळचे केज (जिल्हा बीड) येथील आकाश जाधव हा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. एशियाड एसटी बसमुळेच हा अपघात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले आणि सुधाकर जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मंचर पोलीस या घटनेची विस्तृत चौकशी करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)