एसईसी दिव्यांग विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता

  • गुरू पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम : वृक्षारोपन आणि साहित्याचे वाटप

नायगाव – मावळ तालुक्‍यातील नायगाव येथील “एसईसी सेंटर फॉर इंडिपेंडंट लिव्हिंग’ या दिव्यांग मुलांना शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येत गुरू पौर्णिमेनिमित्त आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त केली.

यंदाच्या गुरू पौर्णिमेचा हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांच्या विशेष आयोजनामुळे खास ठरला. या वेळी प्रकल्प अध्यक्षा शोभा आठल्ये, फिजिओ थेरपिस्ट डॉ. सुप्रिया कोरडे, सहायक प्रशासक अशोक जाधव, मुख्याध्यापिका यास्मिन आलमेल, विशेष शिक्षक यशवंत वाल्हेकर, पूजा कुलकर्णी, मनिषा ढावरे, गणेश रोहमारे, तानाजी मराठे, सुनील चंदनशिवे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती व संस्थेविषयी ऋण-कृतज्ञता व्यक्‍त करीत संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील, अशा भरगच्च वस्तुंचा संच यावेळी भेट दिला. राजू थोरात या माजी विद्यार्थ्याने फळे, फुले, ऑक्‍सिजनसाठी उपयुक्‍त व आयुर्वेदिक औषधी वनस्पतींसह अन्य प्रजातींची शंभर रोपे भेट दिली. या रोपांचे आठल्ये यांच्यासह मान्यवर व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळा आवारात रोपण करण्यात आले. तत्पूर्वी कान्हे येथे पूर्वी संस्था असलेल्या साईबाबा सेवाधाम येथे वृक्षारोपण करण्यात आले.

तब्बल 20 वर्षांनंतर सर्व जण भेटल्याने सर्वांना गहिवरून आले होते, तर अनेकांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी सांगताना व शिक्षकांबद्दल ऋण व्यक्‍त करताना अश्रूंना वाट करून दिली. काही विद्यार्थ्यांनी संस्थेने दरवर्षी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आणि सहलीचे आयोजन करावे अशा सूचना केल्या त्याला तत्वतः आठल्ये व जाधव यांनी आपल्या मनोगतातून मान्यताही दिली.

समीर सय्यद, संतोष राजिवडे, सुभाष शेडगे, दत्तात्रय लोंढे, नवनाथ चोभे, बाळासाहेब सपकाळ, विजय पगडे, सज्जू धोंदफोडे, शांताराम कडू, सतीश बोत्रे, अमर जाधव, सुवर्णा सस्ते, संतोष भालेराव, सारिका भोसलकर, सुरेखा घाटीतावे यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संदीप भोसलकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश रोहमारे यांनी प्रस्ताविक केले. नवनाथ चोभे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)