“एसआरएचा’ प्रश्‍न दोन वर्षांपासून भिजत घोंगडे

लवकर मार्गी लावण्याची नागरिकांनी व्यक्त केली भावना

पुणे – येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न गेल्या दोन वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. त्यामुळे या निमित्ताने तोही प्रश्‍न लवकर मार्गी लावावा अन्यथा अशा प्रश्‍नांना पावसाळ्यातही सामोरे जावे लागते, अशी भावना तेथील काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1995 पर्यंतच्या झोपड्यांचा समावेश एसआरएमध्ये करण्याचा निर्णय झाला होता. येथील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नाईकनवरे डेव्हलपर्सनी स्वारस्यही दाखवले होते. त्यानुसार या विकासकांनी पात्र लोकांची यादीही तयार करायला घेतली. मात्र पुन्हा सन 2000 पर्यंतच्या झोपड्यांचाही समावेश या योजनेत करण्याचा शासन निर्णय झाला आणि पुन्हा ही यादी मागे पडली.

त्यामुळे हा विषय अद्यापही प्राथमिक स्तरावरच आहे. येथील एसआरए योजनेचे काम वेगाने झाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेच असल्याचे मत काही नागरिकांनी मांडले. हा विषय प्राथमिक स्तरावरच असल्याने एसआरएची मंजुरी किंवा अन्य विषयांपर्यंत ही बाब गेलीच नाही. त्यामुळे या कामाला गती मिळावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

बीएसयुपीतील घरांमध्ये तात्पुरते स्थलांतर
ज्या नागरिकांचे संपूर्ण घरच वाहून गेले आहे, त्यांना जेएनएनयुआरएम योजनेतून तयार करण्यात आलेल्या बीएसयुपीतील घरांमध्ये तात्पुरते स्थलांतरीत करावेत, अशा सूचना उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसे पत्रही त्यांनी आयुक्तांना दिले असून, अतिरिक्त आयुक्तांशीही याबाबत बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)