एवढ्या वाईट पद्धतीने पराभूत होऊ असे वाटले नव्हते – रोहित शर्मा

हॅमिल्टन: गेल्या काही वर्षातली ही आमची वाईट कामगिरी होती. एवढ्या वाईट पद्धतीने आमचा पराभव होईल असे मला वाटले नव्हते असे विधान भारतीय संघाचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने चौथ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर बोलताना केले आहे.

यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की, न्यूझीलंडची कामगिरी उत्तम होती. खेळपट्टी चांगली असतानाही आमचे फलंदाज चांगला खेळ करू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना त्याचे श्रेय जाते. कधी-कधी तुम्हाला दबावाखालीही खेळता आले पाहिजे. आमचे फलंदाज आज दबावाचा सामनाकरु शकले नाहीत, हा आमच्यासाठी धडा आहे त्याच बरोबर खेळपट्टीवर जम बसल्यानंतर फलंदाजी करणे सोपे असते. मात्र, आम्ही विनाकारण काही खराब फटके मारले. तेच आम्हाला बाद करण्यास कारणीभूत ठरले. चेंडू स्विंग करत होता. त्यामुळे आम्ही संयम राखायला हवा होता, असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×