एमबीबीएस प्रवेशाच्या अमिषाने महिलेची 3 लाखाची फसवणूक

पुणे – एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी दिलीप नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 30 जुलै 2017 पासून आतापार्यंतच्या कालावधीत स्वारगेट, जेधे चौक येथील एका हॉटेलमध्ये घडली.
याबाबत बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर भागात राहणाऱ्या 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. याबाबतची माहिती त्यांनी घरासमोर राहणाऱ्या एका मुलीला दिली. तिने तिच्या ओळखीच्या दिलीप नावाच्या व्यक्तीची फिर्यादींशी ओळख करून दिली. दिलीपने 15 लाख रुपयांमध्ये फिर्यादींच्या मुलीला एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखविले. फिर्यादींचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर रोख 1 लाख, आरटीजीसद्वारे दीड लाख आणि ट्रान्सफरद्वारे 50 हजार रुपये फिर्यादींनी दिलीप याला दिले. मात्र, दिलीप याने फिर्यादींच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून दिला नाही. घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. फिर्यादींनी तगादा लावल्यानंतर त्याने पोस्ट डेटेड धनादेश दिला. तोही बाऊन्स झाला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी स्वारगेट पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिलीप याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.ए.पाटील अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)