‘एमपीएससी’च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत रोहितकुमार राजपूत पहिला आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ३७७ जागांसाठी परीक्षा झाली होती. १ लाख ९८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ विद्यार्थी पात्र ठरले. त्यातून मुलाखतीसाठी ११९४ उमेदवार निवडले गेले.

ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘एमपीएससी’ मधील टॉप-5 उत्तीर्ण :

पहिला – रोहितकुमार राजपूत

दुसरा – सुधीर पाटील

तिसरा – सोपान टोंपे

चौथा – अजयकुमार नष्टे

पाचवा – दत्तू शेवाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)