एमएच- 370 विमानाबाबतच्या अहवालात नवी माहिती नाही

प्रवाशांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्‍त

पुत्राजया (मलेशिया) – चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या “एमएच-370′ विमानाच्या शोधाच्या बहुप्रतिक्षित अहवालामध्ये कोणतीही नवी माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्‍त करायला सुरुवात केली आहे. मलेशिया एअरलाईन्सच्या या विमानामध्ये 239 प्रवासी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विमानाच्या शोधासाठी मलेशिया सरकारकडून नव्याने करण्यात आलेल्या तांत्रिक शोध मोहिमेचा अहवाल मिळण्याची आतुरतेने वाट बघितली जात होती. या नवीन अहवालामध्ये विमानाच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्‍त केला आणि वार्तालापातून ते बाहेर निघून गेले.

हिंदी महासागराच्या 1,20 हजार चौरस किलोमीटर (46 हजार चौरस मैल)च्या परिसरामध्ये या विमानाचा शोध घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने घेतलेला हा शोध आतापर्यंतच्या जगभरातील कोणत्याही हवाई दुर्घटनेनंतरचा सर्वात मोठा शोध होता. मात्र या विमानाच्या अवशेषांचाही काहीही ठावठिकाणा मिळालेला नाही. मुदत संपल्यामुळे गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर त्याच ठिकाणापासून “ओशन इन्फिनिटी’ या अमेरिकेच्या तज्ञांच्या टीमने नव्याने शोधास सुरुवात केली होती. “शोध लागला नाही, तर शुल्क नाही’ या बोलीवर ही शोधमोहिम सुरू झाली. त्यांनी उच्च तंत्रज्ञानाच्या ड्रोनच्या आधारे समुद्राच्या तळाचे निरीक्षण केले. मात्र त्या मोहिमेतही काहीही निष्पन्न झाले नाही.

मलेशियाच्या नवीन सरकारने मे महिन्यात सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर या मोहिमांचा अहवाल जाहीर करण्याचे करण्याचे मान्य केले होते. विमानाचे काही अवशेष हिंदी महासागराच्या पश्‍चिम किनाऱ्याजवळ आढळले होते. या विमानाच्या अपघातापूर्वी त्याचे अपहरण झाले असावे किंवा दहशतवादी हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)