एमईएसमधील कामगारांचा तीन दिवसांचा संप

जुन्या पेन्शनसाठी निदर्शने : संरक्षण विभागाचे खासगीकरण थांबवा

भिंगार  – भुईकोट किल्ल्यासमोरील मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसेस (एमईएस ) एम्प्लॉईज युनियनच्या नगर शाखेने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. युनियनच्या कामगारांनी नगरच्या कार्यालयाबाहेर अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन भरती झालेल्या सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजनेत समाविष्ट करावे, एनपीएस रद्द करावे, संरक्षण खात्याचे खाजगीकरण न करता तातडीने नवीन भरती करण्याची मागणी अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाने केली आहे. या मागण्यांसाठी सन 2004 पासून पाठपुरावा चालू आहे. संघटनेने वेळोवेळी या मागणीसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला आहे. या मागणीची दखल घेतली जात नसल्याने संप पुकारण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

बी. बी. लोहार, एम. के. ठोंबरे, जे. डी. शिरसाठ, के. डी. वाघस्कर, के. बी. भिंगारदिवे, एस. एस. म्हस्के, एम. एस. ढगे, जी. सी. पाटील, आर. व्ही. भालसिंग, डी. एस. खडके, डी. टी. पांढरे, डी. आर. अनावडे, बी. एम. दळवी, के. एच. तुपे, एस. यू. अल्हाट, ए. डी. पाचारणे आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)