एमआयडीसी रस्त्याची झाली माती

उद्योजक, कामगार हैराण ः अपघातांची संख्याही वाढली

शिंदे वासुली-चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील हंट्‌समन कंपनीसमोरील रस्ता पूर्णपणे उखडला असून, रस्त्याची माती झाली आहे. त्यामुळे रस्ताच मातीत गेला असल्याचे चित्र दिसत आहे.

भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील 60 मीटर रोडवरील हंट्‌समन सर्कल ते चाकण-वांद्रा रस्त्याला जोडणारा एमआयडीसीचा रस्ता काही ठिकाणी पुरता उखडला आहे. रस्त्यावरील डांबर, खडी गायब होऊन रस्त्यावर माती पसरली आहे. याठिकाणी एवढी माती आणि चिखल आहे की, याठिकाणी पूर्वी डांबरी रस्ता होता हे खरे देखील वाटणार नाही.

या रस्त्यावर भांबोली व वासुली एमआयडीसी परिसरातील वाहतूक होत असते. तसेच शिवे, वहागाव, ते आसखेड येथील नागरिकांचा चाकण व तळेगावला जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात. त्यामुळे याठिकाणी वाहनांची सतत वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. औद्योगिक परिसरातील वाहतुकीमुळे रस्त्यावर नेहमी वाहनांची गर्दी असते. रस्त्याचा चिखल झाल्याने कित्येक दुचाकीस्वार घसरुन पडले आहेत. एमआयडीसी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक, उद्योजक, प्रवासी व कामगारांनी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×