एमआयडीसीतील 50 कामगारांना कंपनी सेवेत सामावून घेण्याचा करार 

स्वराज्य कामगार संघटना : कामगारमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश
नगर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वराज्य कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे. संघटनेने नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत कंपनीत 265 कामगारांना कायम सेवेत घेण्यात आले आहे. कंपनीच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून राज्य सरकारकडे 50 कामगार सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन 50 कामगारांना कामगार दिनाच्यानिमित्त एक भेट दिली. या कामासाठी आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप व सहा. कामगार आयुक्‍त नितीन पाटणकर यांचे सहकार्य लाभले, असे स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी सांगितले.
एमआयडीसीतील एक्‍साईड बॅटरी कंपनीत स्वराज्य कामगार संघटनेच्या प्रयत्नातून 50 कामगारांना कंपनी सेवेत घेण्याचा करार कंपनीचे हेड एचआर संतोष डबीर व संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांच्यात झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव आकाश दंडवते, राहुल जाधव, अयाज सय्यद, बाबासाहेब भोर, रामेश्‍वर निमसे, बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सुधाकर चामखडे, सचिन कांडेकर, सुनील देवकुळे, दीपक परभणे, रमेश शिंदे, स्वप्नील खराडे, सचिन कुर्हे, राहुल मेहेरखांब आदी उपस्थित होते.
संतोष डबीर म्हणाले, एक्‍साईड बॅटरी कंपनी कामगारांच्या हिताचे निर्णय घेते. कंपनीने कामगारांकडून उत्पादन वाढ व क्वालिटी याकडे लक्ष दिले आहे. कंपनीच्या चांगल्या निर्णयाचा अनेक कामगारांना लाभ मिळाल्याने ते समाधानी आहेत. कंपनीची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, असे सांगितले.
कामगारांच्या न्यायहक्‍कासाठी संघटना प्रयत्नशील
योगेश गलांडे म्हणाले, स्वराज्य कामगार संघटनेने नेहमीच कामगार कायद्याच्या नियमाप्रमाणे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. या कामी कंपनीचे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर सुब्रा सिन्हा यांनीही कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यास मदत केली. कामगारांच्या प्रश्‍नामध्ये कंपनीशी कधीच तडजोड केली नाही. या कंपनीत नेहमीच स्थानिक कामगारांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या. या पुढील काळातही या कंपनीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य कामगार संघटना नेहमीच प्रयत्नशील राहील, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)