एमआयएमईआर मेडिकल कॉलेजतर्फे महाआरोग्य शिबिर 

तळेगाव दाभाडे – येथील एमआयटीचे संस्थापक गुरुवर्य डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या कार्यास गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरामुळे गरजुंवरील मानसिक आणि आर्थिक भार कमी होईल. एमआयमाईमर मेडिकल कॉलेजमुळे तळेगाव आणि परिसरातील चांगल्या वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक कार्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे तळेगावची नवी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले.

विश्‍वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे व एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि. 27) ते शुक्रवारी (दि. 3) दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, नगरसेविका हेमलता खळदे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, नीता काळोखे, नगरसेवक संदीप शेळके, संदीप कारंडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता व प्राचार्या स्नेहल घोडे उपस्थित होते.

डॉ. सुचित्रा म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सुविधांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्याचा मोफत लाभ महाआरोग्य शिबिरात अधिकाधिक रुग्णांनी करून घ्यावा. हे शिबीर 3 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक शिबिरार्थींपर्यंत पोचण्यासाठी मदतीचे आश्‍वासन दिले. विरोधीपक्ष नेत्या हेमलता खळदे याचेही भाषण झाले. सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)