एनबीएफसींना मदत करू-अरुण जेटली 

File photo..
रिझर्व्ह बॅंक दहा हजार कोटींचे रोखे खरेदी करणार 
नवी दिल्ली: शेअरबाजारातील गुंतवणूकदारांना धीर देण्याच प्रयत्न अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. ते म्हणाले की, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना भांडवल कमी पडू दिले जाणार नाही. त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि छोट्या उद्योगांसाठीही भांडवल सुलभता पुरेशी राहील याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रांना भांडवलाची चणचण भासत आहे आणि आगामी काळात ती आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याचे गृहीत धरून शेअरबाजारात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कोसळले आहेत. त्यामुळे स्वत: अर्थमंत्र्यांना या विषयावर निवेदन करावे लागले आहे.
निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काल बाजार नियंत्रक सेबी आणि रिझर्व्ह बॅंकेने या विषयाकडे लक्ष असून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्याची तयारी असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.
आयएल ऍण्ड एफएस समूहाचा कर्ज परतफेडीचा हप्ता चुकला आहे. त्याचबरोबर तशीच परिस्थिती डीएचएफएल या कंपनीवरही येण्याची शक्‍यता असल्याच्या अफवा सध्या बाजारात आहेत. मात्र, डीएचएफएल या कंपनीने भांडवलाची कसलीही टंचाई नसल्याचे सांगितले आहे.
भांडवल सुलभता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक चलन बाजारात 10 हजार कोटी रुपयांची रक्‍क्‍म उपलब्ध व्हावी म्हणून खुल्या बाजारातून गुरुवारी रोखे खरेदी करणार असल्याची माहिती रिझर्व बॅंकेतर्फे आज जारी करण्यात आली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)