एनपीएमुळे बॅंक ऑफ इंडियाचा तोटा वाढला 

आगामी काळ नफादायक असल्यामुळे शेअर वधारला 
मुंबई – चौथ्या तिमाहीत बॅंक ऑफ इंडियाचा तोटा वाढून तब्बल 3969 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत 1045 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. इतर सरकारी बॅंकांप्रमाणे या बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे बॅंकेला तरतूद करावी लागल्यामुळे बॅंकेचा तोटा वाढल्याचे दिसून येत आहे. या बॅंकेचे ढोबळ एनपीए 16.58 टक्‍क्‍यावर तर निव्वळ एनपीए 8.26 टक्‍क्‍यावर गेले आहे. तोटा वाढल्यामुळे बॅंकेने लाभांश जाहीर केला नाही मात्र तरीही बॅंकेचे शेअर वधारले दरम्यान या अगोदर जाहीर झालेल्या ताळेबंदानुसार सरकारी बॅंकांच्या तोट्यात 2017-18 या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत दुप्पटीहून अधिक वाढ झाली. वार्षिक निकाल घोषित केलेल्या 15 पैकी 13 बॅंकांना अखेरच्या तिमाहीत एकूण 50 हजार कोटींचा तोटा झाला. हा तोटा मागील तिमाहीत 19 हजार कोटी रुपये होता.

नीरव मोदीसारखे घोटाळे व बुडित कर्जांपोटी करावी लागणारी तरतूद यामुळे बॅंकांचा तोटा उच्चांकावर गेला आहे. 15 सरकारी बॅंकांपैकी फक्‍त विजया बॅंक व इंडियन बॅंकेने नफा नोंदवला आहे. बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज, युनायटेड व आयडीबीआय या संकटातील बॅंकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बॅंकांच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सरकारी बॅंकांमधील बुडित कर्जांचे प्रमाण डिसेंबर 2017 पर्यंत 11 ते 12 टक्‍क्‍यांदरम्यान स्थिर होते. पण 2017-18 च्या अखेरच्या तिमाहीत त्यात वाढ होऊन ते 13.41 टक्के झाले. व्यावसायिक कर्जांच्या पुनर्गंठनावर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणल्याने एनपीए वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारी बॅंकांना केंद्र सरकारने 2017-18 या वर्षात 65 हजार कोटींची भांडवली मदत दिली. ही मदत पुरेशी ठरलेली नाही. आर्थिकदृष्ट्‌या सक्षम असलेल्या बॅंकांनाच मदत केली जाईल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पण बुडित व थकित कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तोट्यातील बॅंकांना मदतीची गरज अधिक आहे. यामुळे केंद्राची मदत मिळणार अथवा नाही, याबाबत बॅंकिंग क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)