एनडीएतून बाहेर पडण्याचे केंद्रीय मंत्री कुशवाह यांचे संकेत

पाटणा – राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आज ही माहिती देताना त्यांनी सांकेतिक भाषेचा उपयोग करून आपला इरादा स्पष्ट केला. राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यांनी म्हटले आहे की, यादवांचे दूध आणि कुशवाह यांनी पिकवलेल्या तांदळापासून उत्तम दर्जाची खीर बनवता येऊ शकते.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपेंद्र कुशवाह यांना राजद बरोबर हातमिळवणी करण्याचे जाहीर आवाहन अनेक वेळा केले आहे. त्याला आज त्यांनी प्रथमच असा जाहीर प्रतिसाद दिला. बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बी. पी. मौर्य यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा संदेश दिला. ते म्हणाले की, “यादव का दूध और कुशवाहोंका चावल मिल जाये तो खीर बन सकती आहे. त्यात ब्राम्हणांकडून साखर, चौधरींकडून तुलसी आणि अन्य मागासांकडून ड्रायफ्रुट्‌स मिळतील तर ही खीर आणखीनच चविष्ट होईल.” पक्षाच्या प्रमुखांनी या वक्तव्याद्वारे एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत यावर पक्षाचे सरचिटणीस अभयानंद सुमन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या तरी आम्ही एनडीए बरोबरच आहोत. उपेंद्र कुशवाह यांनी याआधी बऱ्याचवेळा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कारभारावर जाहीर टीकाही केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)