एटीएम फोडले ; बॅंकेला दोन दिवसांनी कळले

एटीएम कटरने कापून दहा लाख चोरले
सहकारनगर भागातील घटना ; दोन दिवसांनी कळले बॅंक व्यवस्थापनाला
पुणे,दि.29- सहकारनगर परिसरातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने एटीएम मशीन कटरने कापून चोरट्यांनी दहा लाख रुपये चोरले. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. एटीएम फोडताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मेन स्विच बंद केला होता.
सहकारनगर परिसरात सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये मागील दोन दिवसांपासून कोणतीही मुव्हमेंट होताना दिसली नाही. यामुळे सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बॅंकेचे अधिकारी एटीएम सेंटरवर दाखल झाले. यावेळी त्यांना एटीएम सेंटरचे शटर लावलेले दिसले. त्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता, एटीएममशीन कटरने कापलेले आढळले. मशीनची पहाणी केली असता, त्यामधील दहा लाखाची रोकड चोरीला गेल्याचे आढळले. सीसीटीव्हीची पहाणी केली असता, त्याचा मेन स्विच बंद केल्याचे निदर्शनास आले. यामुळे सीसीटीव्हीमध्ये रोकड लूटतानाचे चित्रण आढळले नाही. घटना कळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे तसेच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एटीएमला भेट दिली. यानंतर गुन्हे शाखा आणी पोलीस ठाण्याची पथके तयार करण्यात आली. तांत्रीक तपास तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली जात आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या एटीएम सेंटरला सुरक्षा रक्षक नाही. एटीएम सेंटर मुख्य रस्त्यावर आहे. चोरट्यांनी रोकड लूटल्यावर एटीएमचे शटर बंद केले होते. यामुळे शेजारील व्यवसायीकांना तसेच पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एटीएम तांत्रीक बिघाडाने बंद असल्याचे वाटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.