एटीएम कार्ड “ब्लॉक’ झाल्याचे सांगून गंडा

पिंपरी – एटीएम कार्ड “ब्लॉक’ झाल्याचे सांगून कार्ड नंबर आणि “ओटीपी’ नंबर विचारुन एका अज्ञात व्यक्तीने चिंचवड मधील एकाला तब्बल 1 लाख 19 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच चिंचवड येथे उघडकीस आली.

हिंदुराव बर्गे (वय-52, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुराव बर्गे यांना एका अनोळखी इसमाने फोन करुन बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्याने बर्गे यांचे एटीएम कार्ड “ब्लॉक’ झाले असल्याचे सांगून ते चालू करण्यासाठी त्यांच्याकडील एटीएम कार्डचा नंबर आणि “ओटीपी’ नंबर विचारुन घेतला.

यानंतर त्याने बर्गे यांच्या बॅंक खात्यातील तब्बल 1 लाख 19 हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. एटीएम “ब्लॉक’ झाल्याचे सांगून गंडा घालण्याचे प्रकार वारंवार होत असताना याबाबत सामान्यांमध्ये जनजागृती नसल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)