एटीएममधील रक्‍कम लुटणाऱ्याला पकडले

पुणे,दि.29- स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम मशीन उचकटून त्यातील रोकड लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा पोलिसांच्या गस्ती पथकाला तो पहाटे चारच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये संशयास्पदरित्या आढळला होता. त्यामुळे त्याला अटक केली आहे. परवेज रशीद पठाण (21, रा. येरवडा, मूळ रा. दशमी गव्हाण, जि. नगर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई संभाजी धोंडीबा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. येरवडा येथील कटारिया हॉस्पिटललगत असलेले एका बॅंकेचे एटीएम मशीन पठाण हा स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने उचकट असताना पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ एक स्क्रू ड्रायव्हर आढळला. तो एटीएम सेंटरमधील रक्‍कम चोरण्याच्या प्रयत्नात होता. याप्रकरणी पठाण याला न्यायालयात हजर केले असता, त्याने अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, त्याचा इतर कोणी साथीदार आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पठाण याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)