एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली – नितीन गडकरी

सोलापुरातील भाजपच्या समारोपाच्या जाहीर सभेत नितीन गडकरींची टीका

म्हातारपणात सुशीलकुमार निवडणुकीला कशाला उभारले माहिती नाही

सोलापूर, (प्रतिनिधी) – एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली, अशा शब्दत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख या दोघांवर प्रत्यक्ष नाव न घेता टीका केली. सुशीलकुमार माझे चांगले मित्र आहेत, मात्र म्हातारपणात सुशीलकुमार निवडणुकीला कशाला उभारले माहिती नाही , अशी खोचक टीकाही त्यांनी केली. भाजप-शिवसेना , रिपाई (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचाराच्या समारोपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

पाकिस्तान तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही
मुंबईत आतंकवाद्यांचा हल्ला झाला. मेणबत्या लावल्या. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत. जर पाकिस्तानने आतंकवाद्यांना समर्थ देणे बंद केले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सहा नद्या होत्या. तीन नद्यांचे पाणी भारताला तर तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळते. 1960 साली पंडित नेहरू आणि यांच्यामध्ये एक पाणी करार झाला होता. म्हणून भारताने आपल्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले. पण आता तर आमच्या निरपराध लोकांची हत्या करत आहेत. पाकिस्तानला मिळणारे तीन नद्यांचे पाणी मिळणार नाही आणि पाकिस्तान तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही. असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पंडित नेहरू यांच्यापासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच जणांनी गरिबी हटावचा नारा दिला. मुस्लिम, दलित,शेतकरी,आदिवासी यांची गरिबी हटली का? सवाल करत कॉंग्रेस पक्षाने, नेते, कार्यकर्ते, चेले चपाट्यांची गरिबी हटविल्याचे सांगत गडकरी यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला रोजगार हमीची उपमा सांगितले. गरिबाला जात-पात, धर्म पंथ नसतो. गरिबी, उपासमार ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे. 70 वर्षाचा इतिहास हा बेनामी आणि गद्दारीचा इतिहास आहे, गरीब गरीब झाला आणि बेरोजगारांची संख्या वाढली, अशी टीकाही त्यांनी केली.

भारत जगातील नंबर एकची सुपर इकॉनॉमी झाल्याशिवाय राहणार नाही. विकासाचे राजकारण करायचे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. कॅनॉल ऐवजी पाइपलाइनने पाणी देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. टेम्भू आणि म्हैसाळला पाणी आणण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याचेही सांगत लग्न त्यांनी केले, मुलं यांनी झाली , ते पळून गेले, आणि देवेन्द्रच्या मांडीवर बाबा बाबा म्हणून खेळू लागले असे सांगून गडकरी यांनी सिंचन प्रकल्पावरून मिश्‍किल टीका केली. 10 टक्‍यावरून सिंचन 48 टाक्‍यावर नेण्याचा प्रयत्न केल्याचेही गडकरी म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.