एक रुपया चौरस फूट दंड आकरण्याची मागणी

 

पिंपरी – शहरातील शास्तीकर कायमस्वरूपी माफ करुन, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी एक रूपया चौरस फूट दराने दंड आकारण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात दीड लाखांपेक्षा अधिक बांधकेम अनधिकृत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने कुंटे समितीची स्थापना केली. समितीचा अहवाल येताच राज्यात सत्तांतर झाले. भाजपच्या नेत्यांनी 100 दिवसात अनधिकृत बांधकामे नियमित करु, शास्तीकर 100 टक्के माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अद्यापही प्रश्न मार्गी लागला नाही. सरकारने बांधकामे नियमित करण्याचा कायदा केला. खरा परंतु, त्यामध्ये जाचक अटी-शर्ती आहेत. त्यामुळे नियमितीकरणास नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून त्याचा लाभ नागरिकांना होत नाही.
याबाबत राष्टवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, अवैध बांधकामाला शास्तीकर लागू झाल्यापासून 100 टक्के माफी देण्यात यावी. दंड, व्याज, चक्रवाढ व्याज आकारले असेल तर माफ करण्यात यावे. अनधिकृत बांधकामांना एक रुपया प्रति स्कवेअर फूट नियमन शुल्क एकदाच आकारण्यात यावे. व्यावसायिक बांधकामांना पाच रुपये प्रति स्कवेअर फूट नियमन शुल्क असा एकदाच दंड आकारण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केल्यास सत्ताधारी गेल्या चार वर्षांपासून हे विरोधकांचे पाप असल्याचे सांगतात. आमच्या काळात प्रश्न सुटला नाही. त्यामुळेच भाजपला सत्ता दिली आहे. विरोधकांवरच कधीपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून खापर फोडले जाणार आहे. विरोधकांवर खापर फोडण्यापेक्षा प्रश्न सोडविण्यावर सत्ताधाऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन प्रशांत शितोळे यांनी केले आहे.या निवेदनावर विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, विक्रांत लांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)