एक महिन्यात चौकशी पूर्ण करा

मुठा कालवा दुर्घटना : जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.29 – मुठा कालव्याची भिंत पडून झालेल्या दुर्घटनेची एक महिन्यात चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. तसेच, या घटनेत ज्या नागरिकांची कागदपत्रे पाण्यात वाहून गेली आहेत, त्यांना ती परत मिळण्यासाठी “समाधान शिबिरा’चे आयोजन करावे, अशा मागण्या शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केल्या. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या मागण्या मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुठा कालवा दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भटे घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक किशोर राजपूत, विभागप्रमुख सूरज लोखंडे, अनंत घरत आणि तानाजी लोकरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग केलेला तीन कोटींचा निधी नागरिकांच्या विशेष गरजांप्रमाणे वितरण व्हावा. तसेच आणखी काही ठिकाणी कालव्याच्या भिंती खचली असल्याची माहिती घ्यावी, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

———————–
मुठा कालवा फुटू शकतो, असा धोक्‍याचा इशारा देणारे निवेदन फेब्रुवारी 2018 मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या निवेदनावर काय कार्यवाही केली, असा प्रश्‍न गोऱ्हे यांनी उपस्थित केला. तसेच उंदीर, घुशी व खेकड्यांमुळे कालव्याची भिंत पडल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, महावितरण, महानगरपालिका आणि खासगी केबल कंपन्या याच्यामुळे कालव्याच्या भिंतीला पोहोचलेली हानी, याचीही चौकशी व्हावी. ही चौकशी पाटबंधारे विभाग करणार असला तरी त्याचा टाईम बॉन्ड ठरवावा, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)