‘एक परिवर्तन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना’

प्रगतीचं एकेक पाऊल पुढे टाकावंच लागणार आहे. प्रगतीचा महामार्ग सुसाट धावताना गरज आहे ती महामार्गाच्या समांतर चालणाऱ्या पाऊलवाटांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची हे शक्‍यही आहे. महामार्गावरून धावणाऱ्या काही पावलांनी दिशा बदलून ओबड-धोबड वळणांना सपाट करून पाऊलवाटांना विस्तारीत करण्याची. हे विस्ताराचे काम भारत सरकारच्या युवा कल्याण विकास व क्रिडा मंत्रालयांर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षापासून 24 सप्टेंबर 1969 साली महाविद्यालयीन विद्यार्थीच्या मनात सामजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. स्वावंलबन व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे, चरित्रवर्धन व सामाजिक बांधिलकी निर्माण करणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधून डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. अरूण अडसूळ, पोपटराव पवार, आशुतोष राणा तसेच अनेक कवी, लेखक, नट, नाटककार, वक्ता तयार झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे योजनेचे ब्रीदवाक्‍य आहे. हे ब्रीदवाक्‍य आपल्याला सामाजिक जाणीव करून देते. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे काम चालते. महाविद्यालय एक गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये पाच वर्षे काम करावे लागते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करावे लागते. विद्यार्थ्याने दोन वर्ष योजनते काम केल्यावर त्याला प्रमाणपत्र देण्यात येते. दोन वर्षामध्ये एक वर्ष सात दिवसाच्या शिबीरात सहभागी व्हावे लागते. या शिबीरामधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेडी बघायला व अनुभवायला मिळतात. शिस्त, संस्कार, शारीरिक क्षमता, सांस्कृतिक प्रतिभा, वृद्धींगत होण्यास मदत होते. विद्यार्थ्याला आपण काय आहोत याची जाणीव निर्माण होते. त्यातला कवी, नाटककार, साहित्यिक, लेखक, वक्ता बाहेर येतो. कला, क्रिडा, व्यवस्थापन, सेवा, सहकार्य, संघटन, नियोजन यांचे शिक्षण मिळते. समाजामध्ये मिसळण्यासाठी ज्या गुणांची गरज असते. ते गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात.

राष्ट्रीय सेवा योजनानेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, जलसाक्षारता, हरित क्रांती, ऊर्जा बचत, गांडूळ खत प्रकल्प, रक्तदान शिबिर, पुणे ते पंढरपूर वृक्ष ऊर्जा दिंडी, समर्थ भारत अभियान, माती-पाणी परिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आव्हान, याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमात सक्रिय सहभाग असणाऱ्या विद्यार्थ्यास आदर्श स्वयंसेवक तर विद्यापीठाकडून उत्कृष्ट काम करण्याऱ्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यामुळे काही ग्रामपंचायतीना निर्मळ ग्राम पुरस्कार, आदर्श ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पथनाट्याच्या माध्यमातून गावामध्ये जाऊन प्रबोधन केले जाते. यामध्ये पर्यावरण जागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अशा इतर विषयांवर गावामध्ये, गणेशोत्सवात, अनेकांच्या जयंतीनिमित्त अशा विविध ठिकाणी जाऊन प्रबोधन केले जाते.

एकविसावे शतक सुरू होवून एक दशकही उलटून गेले. कित्येक क्षेत्रात लक्षणीय बदल झाले. कित्येक क्षेत्रात लक्षणीय बदल होवून जग पुढे धावतेय वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळेप्रमाणे मानवाला धावावं लागते. काही जण म्हणतात की, आजच्या युगात आजचा युवक धावू शकेल का? असा प्रश्न पडता. पण मी म्हणतो, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तयार झालेला स्वयंसेवक सध्याच्या युगात मागे पडणार नाही ऐवढी मात्र खात्री आहे.

– प्रथमेश कुलकर्णी, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)