एकूण एनपीए 10 टक्‍के, मात्र मुद्रा योजनेतील एनपीए केवळ 4 टक्‍के 

नवी दिल्ली – मोठ्या कंपन्यापेक्षा मुद्रा योजनेतील उत्तम असल्याचे दिसून आले आहे. या योजनेतील अनुत्पादक मालमत्ता केवळ 4 टक्‍के आहे. तर मोठ्या कंपन्याची अनुत्पादक मालमत्ता सर्वसाधारणपणे 10 टक्‍के इतकी आहे.
विशेष म्हणजे मुद्रा योजनेतील एनपीए कमी ठेवण्यामध्ये खासगी बॅंकांपेक्षा सरकारी बॅंका आघाडीवर आहेत. सरकारी बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता 4 टक्‍के आहे तर खासगी बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता 4.2 टक्‍के आहे. वित्तीय सेवा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुद्रा योजनेतील स्टेट बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता तर केवळ 3 टक्‍के आहे.

ही योजना यशस्वी होत असल्याचे पाहून आता अर्थमंत्रालयाने खासगी कंपन्यात सामील करून घेतले आहे. त्यात अमुल आणि पतंजलीचा समावेश आहे. काही विश्‍लेषकांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात परतफेड होते. नंतर त्यात दिरंगाई वाढत जात असते. त्यामुळे सरकारने आणि बॅंकांनी गाफील राहू नये. मात्र अधिकाऱ्यानी सांगितले की या योजनेअंतर्गत केवळ अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. त्यातील एक, मुदत संपली असतानाची आकडेवारी सकारात्मक आहे. त्यामुळे आगामी काळातही यातून लाखो स्वयंरोजगार निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून मुद्रा योजना लाभार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना ही नोकरी देणारी बनली आहे. या उपक्रमामुळे उद्योजकांना सावकार आणि दलालांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायला मदत होत आहे. यामुळे युवक, महिला आणि आपला नवीन व्यवसाय सुरू अथवा त्याचा विस्तार करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 12 कोटी रुपये कर्जापैकी 5.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यापैकी 28 टक्के म्हणजेच 3.25 लाख कोटी रुपयांचे कर्ज हे नव उद्योजकांना दिले आहे. एकूण वितरित कर्जापैकी 74 टक्के महिला लाभार्थी आहेत तर 55 टक्के कर्ज हे अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना देण्यात आले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. छोट्या आणि लघू व्यवसायांना सहाय्य करून ही योजना लोकांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करत आहे आणि लोकांना यशस्वी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. स्वयंरोजगार निर्मितीवर जोर देताना पंतप्रधान म्हणाले की, स्वयंरोजगार निर्मिती असणे ही आता अभिमानाची बाब झाली आहे. याआधी अशक्‍य असणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी लोकांना मदत करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना काही वर्षांआधी लागू केली असती तर लाखो लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायला मदत झाली असती आणि यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबले असते. लाभार्थ्यांनी सांगितले की, मुद्रा योजनेमुळे स्वत:चा व्यवसाय सुरू करायला त्यांना कशी मदत झाली आणि त्यामुळे इतरांसाठी रोजगार कशा प्रकारे उपलब्ध झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)