एका ‘कीस’मुळे झाला ब्रेक अप

उदय चोप्राचा पुन्हा एकदा ब्रेक अप झाला आहे. यावेळेला नर्गिस फाखरीबरोबर त्याचे सूत जुळता जुळता राहिले आहे. नर्गिस फाखरी त्याच्यावर रागावून घरातून निघून गेली आहे. आता ती पुन्हा उदयकडे येईल की नाही, माहित नाही. मात्र या दोघांमध्ये आता झालेला हा ब्रेक अप काही पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही नर्गिस आणि उदय चोप्रामध्ये ब्रेक अप आणि पॅच अप होऊन गेले आहे.

नर्गिस आणि उदयमध्ये जेंव्हापासून अफेअरला सुरूवात झाली होती, तेंव्हापासून ती आई पमेलाबरोबर उदयच्याच घरामध्ये रहात होती. ती अगदी घरातल्या सदस्याप्रमाणेच “आपलेच घर असल्याच्या थाटात’ रहात होती. घरातील अन्य सदस्य तिला भाभी म्हणूनच संबोधत होते. मात्र या दोघांचे नाते अद्याप अधिकृत झालेले नव्हते.

या दोघांमध्ये ब्रेक अप होण्यामागेही काही निश्‍चित कारण आहे. नर्गिसने इन्स्टाग्रामवर अमेरिकन डायरेक्‍टर मॅट अलोजोबरोबरचे आपले काही फोटो शेअर केले होते. मॅटच्या वाढदिवसाच्या पार्टीचे हे फोटो होते. या फोटोंच्याबरोबर नर्गिसने एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. त्यामध्ये ती मॅटला कीस करताना दिसत आहे. या एका “कीस’मुळेच उदय आणि नर्गिसमध्ये ब्रेक अप झाल्याचे समजते आहे.

पहिल्यांदा नर्गिसने उदयला लग्नासाठी विचारले होते, तेंव्हा तो आपल्या करिअरबाबत जरा जास्तच गंभीर होता. नंतर जेंव्हा उदय लग्नाला तयार झाला तेंव्हा नर्गिसने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले होते. यामुळेच दोघांमध्ये मतभेद झाले आणि हे मतभेदच त्यांच्यातल्या ब्रेक अपचे कारण ठरले. काही दिवसांनी सारेकाही ठीक झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय जवळ जवळ निश्‍चित केला होता. तेवढ्यात हे मॅटचे प्रकरण उद्‌भवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)