एकाच वर्षात जळगाव शहराचा विकास करु – गिरीश महाजन

जळगाव – मागील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणतेही टेंडर देताना त्यात पारदर्शता दिसत नव्हती. मंत्री सांगेल त्यालाच हे टेंडर दिले जायचे आणि त्यात जास्तीचे पैसे लावून महाराष्ट्राची लूटही केली जात होती. मात्र आमच्या काळात आम्ही जलसंपदा खात्यात पारदर्शता आणल्यामुळे आमच्यावर कोणी एक शिंतोडाही उडवू शकला नाही, असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच जळगाव महापालिकेत भाजपाला सत्ता दिल्यास एकाच वर्षात जळगाव शहराचा विकास करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जळगाव महापालिका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. इतकंच नाही तर वर्षभरात जळगावचा कायापालट झाला नाही, तर विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सर्वच्या सर्व 75 जागा लढवल्या जात आहेत. तर शिवसेनेकडून 70 जागा लढवल्या जात असल्याने खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच दिसणार आहे. राष्ट्रवादी 43 जागांवर, तर कॉंग्रेसने 16 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना-भाजपात थेट लढत
जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपात थेट लढत होणार आहे. दरम्यान, मनसेच्या महापौरांसह मनसेचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक भाजपात सहभागी झाल्याने भाजपाची ताकद नक्कीच वाढली आहे.

गेल्या निवडणुकीत केवळ 15 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा बहुमताने विजयी होण्याचा विश्वास वाटू लागला आहे. मात्र गेली 40 वर्षे अखंड सत्ता असलेल्या सुरेश जैन यांच्या शिवसेनेला ते शह देऊ शकतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)