पुणे – एकाच दिवशी 270 वर्गीकरणे मंजूर

300 हून अधिक विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वळविला

पुणे – महापालिकेच्या 2018-19 मधील अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली तब्बल 300 हून अधिक वेगवेगळ्या विकासकामांचा निधी इतर कामांसाठी वळविण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभांमध्ये तब्बल 270 हून अधिक प्रस्तावांद्वारे सुमारे 65 कोटींचा निधी वळविण्याचा विक्रमच सत्ताधारी भाजपने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेचे अंदाजपत्रक एप्रिल 2018 मध्ये सुरू झाल्यानंतरच तातडीने हे प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आले होते. मात्र, स्थायी समितीकडून ते थांबविण्यात आले होते. अखेर हे 200 प्रस्ताव अवघ्या तासाभरात मंजूर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने नगरसेवकांनी अंदाजपत्रकात सुचविलेल्या कामांसाठीच्या “सह्याद्री’मधील असून त्यात प्रामुख्याने रस्ते, समाज मंदीर, पदपथ, विद्युत व्यवस्था, तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली प्रस्तावित करण्यात आलेला निधी, ज्यूट बॅग खरेदी करणे, प्रभागासाठी बाकडे खरेदी करणे, ड्रेनेज लाईन बदलणे, पेव्हरिंग ब्लॉक बसविणे, विद्युत व्यवस्था करणे या कामांसाठी वळविण्यात आला असून, सात लाख रुपयांपासून ते तब्बल एक कोटी 50 लाख रुपयांपर्यंतची ही वर्गीकरणे आहेत.

मोडतोडीचे अंदाजपत्रक
धक्कादायक बाब म्हणजे ही वर्गीकरणे ज्या कामांसाठी मंजूर करण्यात आली आहेत, त्या कामांसाठी प्रत्यक्षात या वर्गीकरणाद्वारे वळविण्यात आलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिकपट खर्च येणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होऊन अवघे चार महिने झाले असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे या वर्षीचे अंदाजपत्रक हे केवळ प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या कामांचीच अंमलबजावणी करणारे ठरणार असल्याचे, या वर्गीकरणांवरून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)