एकही शेअर विकणार नाही: येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांचा निर्धार

शुक्रवारीही यस बॅंकेचे शेअर कोसळले 9 टक्‍क्‍यांनी 
मुंबई: येस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडले तरी आपण या बॅंकेचे शेअर कधीच विकणार नसल्याचे येस बॅंकेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, बॅंकेचे संस्थापक म्हणून आपल्याकडे बॅंकेचे 4.34 टक्‍के इतके शेअर आहेत. ते आपण आपल्या हयातीत विकणार नाही. त्याचबरोर हे शेअर आपल्या तीन मुली आणि त्यांच्या अपत्यांकडे जातील. त्यांनीही ते विकू नये, असे आपण त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.
रिझर्व्ह बॅंकेने राणा कपूर यांना जानेवारीत पद सोडण्यास सांगितले आहे. मात्र, संचालक मंडळाने कपूर यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती रिझर्व्ह बॅंकेला केली आहे. कपूर म्हणाले की, सध्या स्थित्यंतराचा काळ आहे. मी पद सोडले तरी बॅंकेचे आणि तिच्या कर्मचाऱ्यांचे चांगले होवो अशीच भावना राहील. संचालक मंडळाला आणि रिझर्व्ह बॅंकेला जो निर्णय योग्य वाटेल तो त्यांनी घ्यावा. आपण त्या सूचनाचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कपूर आणि त्यांच्या मेहुुण्यांनी 2004 मध्ये ही बॅंक सुरू केली होती.
कपूर यांना रिझर्व्ह बॅंकेने राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे या बॅंकेच्या शेअरच्या किमती काही आठवड्यापासून कमी होत आहेत. आजही बॅंकेच्या शेअरच्या किमती 9.50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाल्या होत्या. कपूर यांनी एनपीएचे वर्गीकरण नियमानुसार केले नसल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे बोलले जाते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)