एकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार

बनपुरी : मेळाव्यात बोलताना माजी सभापती नाना पुजारी व इतर

स्वाभिमानाचे प्रदेशाअध्यक्ष रविकांत तुपकर आंदोलनासाठी वडुजला येणार
आंदोलनासाठी गावोगावी बैठका, मेळाव्यांचे आयोजन

वडूज, दि. 23 (प्रतिनिधी)- चालू गाळप हंगामातील ऊसाची एफआरपी एकरकमी आणि गेल्या हंगामातील दुसऱ्या हप्ताच्या मागणीचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. थकीत ऊसबिलाच्या लढाईच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बनपुरीमध्ये मेळावा पार पडला.
भवानी देवीच्या मंदिरातील या मेळाव्याला खटाव तालुक्‍यातील बनपुरी, गुरसाळे, गोपूज, अंबवडे, पिंपरी, चितळी, विखळे, कानकात्रेसह उसपट्टा असलेल्या अनेक गावातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जरंडेश्वर, केनऍग्रो, गोपूजचा ग्रीन पॉवर आणि वर्धन शुगर अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वच कारखान्याच्या विरोधात तीव्र भूमिका मांडल्या. गाळप हंगाम सुरू होताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तातडीने एकरकमी द्यावी आणि मागील हंगामातील थकबाकी द्यावी, अन्यथा प्रजासत्ताकदिनापासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी अनेक वक्‍त्यांनी दिला.
यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत एफआरपीची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही. कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी राहील, असे आश्वासन खासदार शेट्टी यांनी यावेळी दिले. पुण्यातील साखर आयक्त कार्यालयावरील 28 तारखेच्या मोर्चाला खटावमधील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही खासदार शेट्टी यांनी केले. प्रजाकसत्ताकदिनाच्या लढाईला पाठबळ देण्याआठी 26 जानेवारीला स्वाभिमानीचे प्रदेशअध्यक्ष रविकांत तुपकर, खटाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी गोपूजमध्ये ऊस उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली. मागील थकबाकी न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या मालकांच्या बंगल्यासमोर आंदोलने सुरू करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी ऍड. प्रमोद देवकर, सविता देवकर, दत्तूकाका घार्गे, अजित पवार, सचिन पवार, दत्तात्रय पवार, विनोद देशमुख यांच्यासह अनेक स्वाभिमानाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)