एकनिष्ठेने काम केल्यास मानाचे स्थान मिळते

गायकर ः आय.टी. आय. मध्येकरिअरवर व्याख्यान
अकोले – एकनिष्ठ व विश्‍वासास पात्र राहून काम केल्यास जीवनात निश्‍चितच मानाचे स्थान मिळते, असे प्रतिपादन मारुती सुझुकीच्या नेक्‍सा सर्व्हीसेस चेकार्यव्यवस्थापक आशिष गायकर यांनी केले.
येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्येआयोजित करिअर इन नेक्‍सा सर्व्हीसेस विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचेसहसचिव भाऊसाहेब गोडसे होते. डॉ. जनार्दन मोरे, पॉलिटेक्‍निकचेबोडके, कानवडेउपस्थित होते.
गायकर म्हणाले, आपण काम करीत असलेल्या ठिकाणी एकनिष्ठपणेव आपल्याविषयी विश्‍वास निर्माण होईल असेकाम करावे. कामाची धरसोड करु नये. 4 वर्षचांगलेपरिश्रम घेतले तर 40 वर्षआराम मिळेल. नोकरी मिळवण्यासाठी लाच देऊ नये. आई- वडिलांचा सन्मान करा, त्यांना जीवनात कधीही विसरु नका, असा सल्ला त्यांनी दिला. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे. कारण आपले जीवन फार मोलाचेआहे. तुम्ही सुखी असाल तर आई- वडिलांचे आयुष्य वाढते. काम करताना लक्ष विचलित होऊ देवू नका, असेही आवाहन गायकर यांनी केले. अकोले आय.टी. आय. च्या 30 विद्यार्थ्यांना नेक्‍सा सर्व्हीसेस कंपनीमध्ये संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जनार्दन मोरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्यविद्याचंद्र सातपुतेयांनी केले. एल. एस. नवले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)