एकदिवसीय क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी

संग्रहित छायाचित्र

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच मानांकन याद्या जाहीर केल्या असून एकदिवसीय संघाच्या मानांकन यादीत भारतीय संघ 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मालिकेत विजय संपादित केल्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. तर इंग्लंड 126 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या यादीतही भारताचा दबदबा कायम असून फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी तर गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह अव्वल आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराचा किताब पटकाविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला लाभ झाला असून त्याने 3 स्थानांची प्रगती करताना 17 वे स्थान पटकाविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या मानांकनात सुधारणा झाली असून त्याने 7 स्थानाची प्रगती करताना गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. तर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्थानचा रशीद खान आहे. अव्वल स्थानी असलेल्या जसप्रीत बुमराहचे 808 गुण आहेत. रशीद खानचे 788 तर ट्रेंट बोल्टचे 732 गुण आहेत. चौथ्या आणि पाचव्य स्थानांवर भारतीय फिरकीपटू असून चौथ्या स्थानी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आहे तर पाचव्या स्थानी युझूवेंद्र चहल आहे. कुलदीपची एका स्थानाची घसरण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)