एकतर्फी प्रेमातून तरुणीचा आवळला गळा ; तरुणाने केली आत्महत्या

पुणे,दि.30- एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचा गळा आवळून तीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर संबंधीत तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथे एका चाळीत घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजाराम मंजुनाथ पटघर(28,रा.सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व मयत राजाराम एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. दरम्यान राजाराम याने फिर्यादीला घरी बोलावून घेतले होते. तेथे त्याने तीला लग्नाची गळ घातली. मात्र फिर्यादीने यास नकार दिला. यामुळे रागाच्या भरात त्याने नायलॉनच्या दोरीने तीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी कशीबशी सुटका करत रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतर तीने पोलिसांकडे राजाराम विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांना राजाराम हा त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनमीत राऊत करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.