एकट्या महाराष्ट्रात फ्रान्स-इटलीहूनही अधिक रुग्ण

देशात रोजचे कोरोना रुग्ण एक लाखाकडे...

नवी दिल्ली – देशात कोरोना भयंकर रूप धारण करत आहे. गेल्या एक दिवसात 92,943 नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांची ही जगातील सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आता रोज 50 हजार रुग्णांचे राज्य होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात फ्रान्स-इटलीहूनही अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

जगात ब्राझील व अमेरिकेतच महाराष्ट्रापेक्षा अधिक रुग्ण आढळताहेत. फ्रान्स-इटली या देशांत रोज 40 हजारहून कमी रुग्ण आढळत आहेत.
गुजरात, पंजाबसारख्या अनेक राज्यांत रुग्णसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 49,447 रुग्ण आढळले व 277 मृत्यू झाले. तर, देशात 514 जणांचा मृत्यू झाला.

नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी आहे. अन्य मोठ्या राज्यांत संसर्ग दर 5%हून अधिक आहे. हा अनियंत्रित श्रेणीमध्ये मोडतो, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशात कानपूरजवळ अकबरपूर येथे एका नर्सने डोस घेण्यासाठी आलेल्या महिलेस दोनदा लस टोचवली. फोनवर बोलत-बोलत ही नर्स डोस देत होती. यावरून कुटुंबियांनी गोंधळ घातल्यावर जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र प्रतापसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले.

देशात रोजचे कोरोना रुग्ण एक लाखाकडे…
1, भारतात एका दिवसात 92,943 रुग्ण, जगात सर्वाधिक संख्या
2. द्रमुक खासदार कनिमोझी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
3. ओडिशात पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर निर्जंतुक करण्यासाठी दर रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. 22 जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी आहे.
4. छत्तीसगडमध्ये दुर्ग जिल्ह्यात स्थिती अत्यंत चिंताजनक होत चालली असून या जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत लोकांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे.

  1. हिमाचलमध्ये 15 एप्रिलपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील. स्पर्धा परीक्षांत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची लेखी सहमती लागेल.
  2. उत्तर प्रदेशात 11 एप्रिलपर्यंत आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील.
  3. बिहारमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा 11 एप्रिलपर्यंत बंद.
  4. केंद्र सरकारने राज्यांना काही काळासाठी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लसीसाठी नोंदणी करू नका, अशी सूचना केली आहे.
  5. आयपीएलही कचाट्यात – आयपीएल 9 एप्रिलपासून आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोना झाला अन्‌ तो विलगीकरणात आहे.
  6. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांपैकी आठ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.