‘एअर एशिया’च्या सीईओविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे परवाने मिळवताना नियमभंग केल्याने एअर एशिया कंपनीचे सीईओ टोनी फर्नांडिस गोत्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी फर्नांडिस यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून या सर्वांना अटक होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी वेगवेगळे परवाने काढावे लागतात. या परवान्यांसाठी ५ वर्षांचा राष्ट्रीय विमान सेवेचा अनुभव तसेच कंपनीच्या मालकीची कमीतकमी २० विमाने असणे बंधनकारक आहे. मात्र, परवान्यांसाठी आवश्यक निकषांची पूर्तता न करताही एअर एशियाने परवाने मिळवल्याने कंपनी अडचणीत आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांनी नियमांची पूर्तता न करता सरकारी कर्मचाऱ्यांना लाच देऊन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे परवाने मिळवल्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. टोनी यांच्यासोबतच अॅन्टोनी फ्रान्सिस, सुनील कपूर, दीपक तलवार, राजेंद्र दुबे या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्वांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून सीबीआयने मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसह देशातील सहा ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)