एअर एशियाच्या सीईओवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली – एअर एशिया समुहाचे मुख्य कार्यकारी टोनी फर्नांडिस आणि अन्य काही जणांविरोधात इंटरनॅशनल फ्लायिंग लायन्ससेस मिळवण्यासाठीच्या निकषांचा भंग केल्याबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे लायसेन्स मिळवण्यासाठी 5/20 हे नियम शिथील करून निकषांचा भंग केल्याबद्दल तसेच “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’च्या नियमांचा भंग केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील “5/20′ नियम म्हणजे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे लायसेन्स मिळवण्यासाठी कंपनीकडे किमान 5 वर्षांचा अनुभव आणि 20 विमानांचा ताफा असणे आवश्‍यक असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एअर एशिया समुहाचे मलेशियाचे सीईओ ऍन्थनी फ्रान्सिस उर्फ टोनी फर्नांडिस यांच्या व्यतिरिक्‍त प्रवासी खाद्यपदार्थ मालक सुनिल कपूर, एअर एशियाचे संचालक आर. वेंकटरामन, विमान वाहतुक सल्लागार दीपक तलवार, सिंगापूरस्थित “एसएनआर’ट्रेडिंगचे संचालक राजेंद्र दुबे आणि अपरिचित व्यक्‍तींविरोधात “एफआय आर’दाखल करण्यात आली आहे.
टोनी फर्नांडिस यांनी लायसेन्स मिळवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून 5/20 नियम काढून टाकला आणि नियमनाच्या धोरणांमध्येही बदल घडवून आणला असा आरोप आहे. या संदर्भात दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरुमधील सहा ठिकाणी छापेही घालण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)