ऍड. पंकज देवकर यांची निवड

मायणी, दि. 18 (प्रतिनिधी) – मोही, ता. माण येथील ऍड. पंकज देवकर यांची मुंबई उच्च न्यायलायतील ऍडव्हेकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या वकिलांच्या संघटनेच्या ग्रुप सदस्य पदवी सर्वाधिक मताधिक्‍याने निवड झाली आहे.
पंकज देवकर यांनी 2006 मध्ये बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या वसंतराव पवार विधी विद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण करुन ते 2006 पासून मुंबई उच्च न्यायालयत वकिली करत आहेत. पश्‍चिम भारतातील ऍडव्होकेट असोसिएशन ऑफ इंडिया ही सर्वात जुनी संघटना असून या संघटनेला 150 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ऍड. देवकर हे पुणे जिल्हा परिषदेच्या उच्च न्यायालयातील बोर्डावर कार्यरत आहेत. तसेच ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात महत्वाचे योगदान देत असतात. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक करण्यांत येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)