ऍट्रॉसिटी कायदा शिथील होणे भाजपला महागात पडणार – कॉंग्रेस

पाटणा – ऍट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व त्यावर एनडीए सरकारची निष्क्रियता हे सर्व प्रकरण भाजप व एनडीएला आगामी निवडणुकीत महागात पडणार आहे असे कॉंग्रेसचे बिहारचे निरीक्षक शक्तिसिंह गोहेल यांनी म्हटले आहे. येथे पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की बिहारच्या निवडणुकीत एनडीएचे घटक पक्ष असलेले संयुक्त जनता दल, लोजप आणि आरएलएसपी हे पक्ष बहुतांशी दलितांच्या मतांवर निवडून आलेले पक्ष आहे त्यांना जनता या निवडणुकीत जागा दाखवून देईल असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की राजीव गांधी यांनी बिहारच्या दौऱ्यानंतर दलितांच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी कायदा केला होता. पण त्या कायद्यात आपोआप अटक करण्याची तरतूद शिथील करण्यात आल्याने हा कायदा निरस्त झाला आहे. त्याचे विपरीत परिणाम दलितांना भोगावे लागत आहेत. यासाठी भाजपच थेट जबाबदार आहे असा आरोपहीं त्यांनी केला. आज एनडीएतील बिहारमधील अनेक घटक पक्ष भाजपला सोडून आमच्याबरोबर येऊ शकतात त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक घडामोडी घडू शकतात असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)