ऊष्माघात झाल्यास ‘हे’ करा प्रथमोपचार

शरीरातील उष्णतानियमनाच्या कार्यात बिघाड झाल्यास उद्भवणारी एक स्थिती. उच्च तापमानाच्या सान्निध्यात खूप वेळ राहिल्यास वा शरीरात खूप उष्णता निर्माण झाल्यास अशी स्थिती उद्भवते

डॉ. शाम अष्टेकर

प्रथमोपचार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऊष्माघात झालेल्या व्यक्तिला त्वरीत थंड करा जमल्यास, त्याला थंड पाण्यात ठेवा; त्याला थंड पाण्याच्या ओल्या कपड्यात गुंडाळा; किंवा त्याच्या त्वचेवर थंड पाणी शिंपडा, त्यावर बर्फ फिरवा, किंवा थंड घड्या ठेवा. एकदा की व्यक्तीचे तापमान 101 फॅं.च्या खाली उतरले की, त्याला थंड खोलीत निजवा. तर त्याचे परत तापमान वाढु लागले, तर, परत थंड करण्याची पद्धत अवलंबा. तर तो/ती पिऊ शकत असेल तर, त्याला थोडे पाणी पाजा. त्याला कुठलेही औषध देऊ नका. डॉंक्‍टर कडे न्या

कापणे

त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका.
रक्त थांबे पर्यंत जख्मेवर दाबुन धरा.
त्यावर पट्टी लावा.
जर कापलेली जखम खोल असेल, तर त्वरीत डॉंक्‍टर कडे जा.
ओरखडे/खरचटणे
त्या भागाला साबण लावुन कोमट पाण्याने धुवा, जर काही धुळ असेल तर धुवुन टाका.
जर रक्त येत असेल तर त्यावर जंतुसंसर्गा पासुन वाचविण्यासाठी पट्टी लावा.
जखमेत जंतुसंसर्ग झाल्याच्या खुणा
सुज येणे
लाली येणे
दुखणे
ताप येणे
पु होणे

गुदमरणे

एखादा माणूस गुदमरत असेल तर तो खोकत असे पर्यंत त्याला थांबवू नका. जर खोकून अडकलेली वस्तू बाहेर फेकली गेली नाही, आणि रुग्णाला श्‍वासोश्‍वासास त्रास होवू लागला तर, किंवा तो काळा निळा पडू लागला व बोलून सांगू शकत नसला, पटकन त्याला विचारा तुमच्या घशात काही अडकले आहे कां ? गुदमरणारा माणूस डोके हलवून हो म्हणू शकतो पण बोलू शकत नाही. हा प्रश्‍न विचारणे गरजेचे आहे, कारण हदयविकाराची लक्षणे देखील गुदमरण्यासारखीच असतात, पण त्यात रुग्ण बोलू शकतो.

प्रथमोपचार

पछातीवर दाब देणे फक्‍त काही अतिदक्षता असेल तेव्हाच वापरा
पत्याच्या मागे ऊभे राहुन तुमचे हात त्याच्या छातीच्या बाजुने पुढे आणा.
पहात एकात एक गुंतवा, व अंगठ्याच्या भागाकडुन रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीच्या जरा वर दाबा.
पतुमचा जोर जरा वाढवा व तुमचे हात बाहेरच्या बाजुला ओढा व वरच्या जबड्यावर आत बाहेर असा भार द्या.
पही पद्धत तो पर्यंत वापरा जोपर्यंत रुग्ण बेशुद्ध होत नाही वा जोरात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही.

टीप
पया संकटाला तुम्ही तोंड देऊ शकत नाही असे वाटले तर रुग्णाला त्वरीत डॉंक्‍टर कडे न्या.

चक्‍कर येणे

परुग्ण चक्‍कर येण्याआधी खालील पैकी एक कारण सांगू शकेल
डोके हलके होणे
थकवा जाणवणे
मळमळ
त्वचा गळणे वा पिवळी पडणे
जर एखाद्याला चक्कर येत असेल तर त्याने …
लगेच खाली झोपावे
डोके गुडघ्याकडे न्याव
डोके गुडघ्याकडे हृदयापासून खाली नेल्यास, रक्‍त प्रवाह मेंदू कडे होवू लागेल.

जर रुग्ण बेशुद्ध झाला तर 
रुग्णाचे खाली डोके वर पाय करा.
घट्ट कपडे सैल करा
त्याच्या तोंडावर, गळ्यवर थंड पाणी मारा किंवा कपड्याने पुसा.
ब-याच वेळा, रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. त्याला त्याच्या बद्दलचे प्रश्न विचारुन तो पुर्ण शुद्धीवर आला आहे याची खात्री करुन घ्या.
डॉक्‍टरला दाखवणे केव्हाही चांगले

फीट येणे
स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येऊ लागतात. रुग्ण जिभ चावू शकतो वा श्‍वास घेणे थांबवू शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडू शकतात खुग जास्त प्रमाणात लाळ गळु लागते वा तोंडातून फेस येवू लागतो.
जर रुग्णाने श्‍वासोश्‍वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशा वेळी, ताबडतोब डॉंक्‍टर कडे धाव घ्या.

त्वरित उपचारासाठी काही पद्धती
रुग्णा जवळचे सगळ्या वस्तु दुर करा व त्याच्या डोक्‍याखाली काहीतरी मऊ द्या.
रुग्णाने श्‍वास घेणे थांबविले तर,त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्‍वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा
शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळे पर्यंत मदत करा.
दारं-खिडक्‍या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.

काय करू नये…
पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैरसमज आहे.
फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदस्तीने थांबवू नका.
थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्‍टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.

भाजणे-जळणे
भाजण्याचे परिणाम विचित्र असतात – कातडी खराब होणे, हातपाय वेडेवाकडे होणे आणि मुख्य म्हणजे मानसिक धक्का. तसेच हे फार दूरगामी परिणाम आहेत. तातडीने, काळजीपूर्वक योग्य उपचार करणे आवश्‍यक आहे.

जळणे आणि भाजणे
थेट आगीच्या संपर्काने तसेच काही संहत रसायनांमुळे कातडी जळते आणि भाजते. ह्याची काही मुख्य कारणे अशी –
स्वयंपाकघरातील गरम भांडी, तवे इ.
स्वयंपाकघरातील विजेवरची उपकरणे
विस्तव किंवा शेकोटीमूळे अचनाक आग लागणे किंवा भाजणे
अनपेक्षितपणे कपडे पेटणे
संहत रसायने व ब्लीच
अति सूर्यप्रकाश किंवा वारा
दोरांमुळे होणारी इजा
घरगुती कारणाने भाजल्यास त्यावर घरातच उपचार रणे गरजेचे आहे; स्वयंपाकघरात हे प्रकार सर्वाधिक संख्येने होत असल्याने उपायदेखील तेथेच होऊ शकतो. अर्थात मुळात असे प्रसंग होऊच नयेत ह्यासाठी काळजी घेणे हे सर्वोत्तम. भाजण्याचा सर्वाधिक धोका वृद्ध, अपंग आणि लहान मुलांना असतो – विशेषकरून रांगत्या बाळांना. अशांच्या जखमांची गंभीरपणे काळजी घ्या.

या गोष्टी करणे टाळा
भाजण्याने शरीरावर होणारे परिणाम आणि डॉक्‍टरी मदत मिळेपर्यंत करायचे उपचार पाहण्याआधी आपण काय करू नये हे समजून घेऊ –
भाजलेल्या जागी कधीही लोणी, पीठ किंवा खाण्याचा सोडा लावू नका
जखमेवर तेल, मलम इ. लावू नका
जखमेवर फोड आल्यास ते फोडू नका
जखमेला गरजेपक्षा जास्त हात लावू नका
जखमेवर कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढू नका
आजकाल कृत्रिम धाग्याने बनवलेले कपडे वापरले जातात. पण अशा प्रसंगी ते चक्क वितळतात आणि कातडीला चिकटून बसतात. त्यामुळे ते ओढून काढल्यास त्याबरोबर कातडीही सोलली जाते. ह्याने दुखणे तर वाढतेच शिवाय नंतर त्या जखमेत जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे प्रथमोपचारा दरम्यान कपड्यांना हात न लावणे चांगले..

सर्वसाधारण उपचार

भाजण्याचे काही विशिष्ठ प्रकार सोडले तर उपचार साधारणपणे सारखेच आहेत – सर्वप्रथम जखमा किती मोठ्या किंवा गंभीर आहेत ह्याचा अंदाज घ्या. भाजणे साधारणपणे आणीबाणीच्या प्रसंगांशी किंवा अपघातांशी निगडित असते – उदा. घराला आग लागणे, रस्त्यावरील अपघातात पेट्रोल पेटणे इ. म्हणूनच मदत करण्याचे नियमही तितकेच महत्वाचे आहेत. भाजलेली व्यक्ती घाबरलेली असते, तिला मानसिक धक्का बसलेला असतो. अशावेळी आपण स्वतः शांत राहून ग्रस्त व्यक्तीला धीर देणे आवश्‍यक आहे. गोंधळून न जाता तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. कातडी आणि पेशी जळाल्यावर शरीरातील द्रवपदार्थ कमी होतो. जळालेल्या कातडीत ऊष्णता साठून अधिकच नुकसान होते. त्यमुळे पहिल्यांदा ही ऊष्णता कमी करणे म्हणजेच शरीर थंड करून त्याचे तापमान कमी करणे आवश्‍यक असते.

ही काळजी घ्या

पभाजलेला अवयव थंड पाण्यात बुडवा. एखादी बादली किंवा कपडे धुण्यासाठीचे मोठे बेसिन ह्यासाठी वापरता येईल. किंवा नळातून येणार्या पाण्याच्या हलक्‍या धारेखाली धरा.
पथंड पाणी टाकण्याचा हा उपाय किमान 15 मिनिटे किंवा दुःख कमी होईपर्यंत करा. काही अवयव पाण्यात बुडवणे शक्‍य नसते – उदा. भाजलेले तोंड – अशावेळी स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून वापरा. कापडाची ही पट्टी बदलत रहा मात्र भाजल्याची जागा तिने घासू नका. ह्यामुळे त्या भागातील ऊष्णता काढून घेतली जाईल आणि फोड येण्यासारख्या पुढच्या दुःखदायक गोष्टी काही प्रमाणात टाळता येतील.

पशरीरावर घट्ट बसणाऱ्या बांगड्या, आंगठ्या, पायातील बूट अशांसारख्या वस्तू शक्‍य तितक्‍या लवकर काढून घ्या कारण कालांतराने अंगावर सूज येऊ शकते.
पभाजल्याच्या छोट्या आणि वरवरच्या जखमा हलक्‍या हाताने पुसून त्यांवर बॅंडेज बांधता येईल. मात्र मोठ्या आकाराच्या आणि खोल जखमा, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, स्वच्छ व नुकत्याच धुतलेल्या व सुत न निघणाऱ्या कापडाने हलक्‍या हाताने झाकाव्या. (हातापायांसाठी उशीचा स्वच्छ अभ्रा वापरता येईल)
डॉक्‍टरांना किंवा रुग्णवाहिकेला बोलवा.
पोस्टाच्या तिकिटापेक्षा म्हणजे साधारण दोनअडीच सेंटिमीटरपेक्षा मोठी जखम डॉक्‍टरांनी पाहणे आवश्‍यक असते.
गंभीर भाजण्याच्या प्रकारात रुग्णाला दवाखान्यात नेईपर्यंतच्या काळात जखमेवर बर्फाचा चुरा कापडातून बांधता येईल.
जंतुसंसर्ग टाळण्यासाठी भाजल्याची जखम झाकणे अत्यंत गरजेचे आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे भाजलेल्या व्यक्‍तीला आपल्या जखमा थेट दिसत नसल्याने त्याची भीती जरा कमी होऊन तो शांत राहतो. पांघरण्यासाठी आदर्श म्हणजे टेबलक्‍लॉथ किंवा चादर
डॉक्‍टर येईपर्यंत भाजलेल्या व्यक्‍तीला धीर द्या. लहान मुलास प्रेमाने वागवा.

विशेष काळजी घेण्याजोगे प्रसंग कपडे पेटणे

भाजलेल्या व्यक्‍तिच्या जळत्या कपड्यांवर पाणी टाका किंवा आग विझविण्यासाठी त्यास कोट, चादर, ब्लॅंकेट किंवा अशाच एखाद्या मोठ्या कपड्यात हलकेच गुंडाळा. आपण विझवत असलेली आग आणि आपण स्वतः यामध्ये हा कपडा राहील ह्याची काळजी घ्या.
आग लागलेली व्यक्ती घाबरून इकडे तिकडे पळण्याची आणिांमुळे आग आणखीनच पसरण्याची शक्‍यता असते. तसेच ही व्यक्ती मोकळ्या हवेत गेल्यास आग आणखी भडकू शकते. म्हणून तिला शक्‍य तितके एका जागी थांबवण्यचा प्रयत्न करा. ज्वाला विझल्यानंतरदेखील प्रथमोपचार चालू ठेवा.

डोळ्यात रसायन उडणे
हा प्रकार फारच गंभीर असून जखमी व्यक्ती कायमची आंधळी होण्याची शक्‍यता असते. म्हणूच जो काही उपाय कारावयचा असेल तो तातडीने करावा लागतो कारण हे रसायन पातळ होऊन त्याची ताकद कमी होणे गरजेचे असते.
अशा व्यक्तीस पाठीवर उताणे झोपवा, आंगठा व पहिल्या बोटाने तिचे डोळा उघडून धरून त्यामध्ये सतत थंड पाणी ओतत रहा. हे पाणी नाकाच्या बाजूने ओता म्हणजे दुसरा डोळा त्यापासून सुरक्षित राहील.
ह्यानंतर डोळ्यांची सतत उघडमीट करवा म्हणजे पापण्यांच्या आत बसलेले रसायन निघू शकेल
किमान दहा मिनिटे डोळा धुवा, ह्या वेळेमध्ये कोणतीही काटकसर करू नका.
ह्यानंतर डोळ्यांवर हलक्‍या हाताने पट्टी बांधा व ती जागेवरून सरकत नाही हे पहा
जखमीस धीर द्या आणि त्यास दवाखान्यात घेऊन जा.

विजेमुळे भाजणे
ह्या जखमा आकारने लहान दिसतात; पण खोल असू शकतात. विजेचा प्रवाह ज्या ठिकाणी शरीरात प्रवेश करतो आणि जेथून बाहेर पडतो तिथे साधारणपणे ह्या आढळतात.
उपचार करण्याआधी वीज बंद करून भिंतीवरील सॉकेटमधून प्लग सोडवा.
ही व्यक्ती पाण्यात पडली असल्यास तुम्ही स्वतः पाण्यात जाऊ नका. एखादेवेळी तुम्हांलाच विजेचा धक्‍का बसेल कारण कोणत्याही प्रकारच्या दमट पदार्थातून वीज चटकन वाहते. म्हणूनच जखमीच्या काखेत हात घालून ओढू नका.
या व्यक्‍तीचा श्‍वास तपासा. वीज छातीतून गेली असल्यास हृदय आणि परिणामी श्‍वसन थांबले असेल. असे असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्‍वसन द्या.
भाजण्यावरचे प्रथमोपचार चालू ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)