उसने पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्यावर गुन्हा

पैशाच्या बदल्यात फ्लॅटची नोटरी; मात्र फ्लॅट नावावर करण्यास टाळाटाळ
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)
उसने पैसे देण्यास टाळाटाळ करत दमदाटी करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानदेव कृष्णा यादव यांनी याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महेश जयराम निकम असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ज्ञानदेव कृष्णा यादव (रा.सदरबझार सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, महेश निकम याने त्याच्या व्यवसायासाठी एका बॅंकेतून कर्ज घेतले होते. ते भरण्यासाठी यादव यांच्याकडून 36 लाख रुपये घेतले होते. घेतलेले पैशाचा तगादा यादव यांनी त्याच्याकडे लावला होता. त्यावेळी त्या पैशांच्या बदल्यात महेश याने त्याचा प्लॉट नावावर करून देतो, असे सांगितले होते. तशी नोटरीही केली. मात्र, प्लॉट नावावर करून न देता तो आज देतो, उद्या देतो, असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवार, दि. 28 रोजी महेशकडे यादव यांनी पैशांची मागणी केली असता तुला काय करायचे आहे ते कर, मी पैसेही देणार नाही आणि प्लॉटही देणार नाही, असे सांगीतले. त्यानंतर निकम याच्याकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात महेश जयराम निकम (रा. कोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)