उरूळी ते स्वारगेट बससेवा बंद पाडली

प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर : प्रवाशांचे अतोनात हाल

उरुळी कांचन- उरूळी कांचन ते स्वारगेट बससेवा पीएमपीएल प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. ही बससेवा उरुळी कांचन ते स्वारगेट अशी सुरू होती. परंतु हडपसर येथे बस डेपो झाल्यापासून ही बस बंद पाडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांतून संताप व्यक्‍त होत आहे.
हडपसर येथे बसडेपो सुरू झाल्यानंतर स्वागरेटची सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर उरुळी कांचन ते हडपसर बस सेवा सुरू करण्यात आली. स्वागरगेटची बस बंद केल्यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी, प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. पूर्वीची सुरू असलेली उरुळी कांचन ते स्वारगेट किंवा सारसबाग ही बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.

स्वारगेटपर्यंत बससेवा सुरळीत केल्यास पुलगेट, स्वारगेटपर्यंत प्रवास सुलभ होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीान विद्यार्थी, चाकरमान्यांना सोयीचे होणार आहे. तसेच वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करून संबंधित प्रशासन बधत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
हडपसरपर्यंत प्रवास करताना वाहक सुट्टे पैसे परत देत नाही. हडपसर नंतर दुसऱ्या बसने प्रवास करावयाचा असल्याने अनेक प्रवाशाचे पैसे वाहकाकडे राहतात. सुट्टे पैसे नाही म्हणून अनेकवेळा वाहक उद्धट बोलतात, अशी तक्रार महिला प्रवासी रोहिणी काळे यांनी केली. उरुळी कांचन ते स्वारगेट ही बससेवा चांगली होती. यामुळे पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी लवकर जाता येत होते.

  • उरूळी कांचन ते स्वारगेट बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात वाहकांच्या तक्रारी आल्या आहेत. पुढील आठवड्यात उरुळी कांचन ते स्वारगेट ही बससेवा सुरू होण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेऊन बस पुन्हा सुरू करण्यासाठी सांगणार आहे.
    – किर्ती अमित कांचन, नियोजन समिती सदस्या, जिल्हा परिषद.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.