उरूळीकांचन गावाला सरपंच आणि उपसरपंचही नाही

उरुळी कांचन- पूर्व हवेली आणि दौंड तालुक्‍याच्या सिमेवर सर्वात मोठी बाजारपेठ आणि आर्थिक उलाढालीचे असलेले उरूळीकांचन गाव सरपंच आणि उपसरपंचाविना पोरके झाले आहे. गावातील अनेक मुलभुत कामे होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे गावकारभार सांभाळण्याकरिता नेमण्यात आलेल्या प्रशासकांवर गावातील प्रश्‍न सोडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागातील महत्त्वाचे मानले जाणाऱ्या उरूळीकांचन गावात सध्या मुलभुत प्रश्‍नांनी डोकेवर काढले आहे. गावचा कारभार सांभाळणारे लोकनेतृत्त्वच नसल्याने प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. तसेच, विविध योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिताही गावचा लोकप्रतिनिधी नसल्याने सध्या गावाला निधी मिळत नसल्यानेही याचा परिणाम जाणवू लागला आहे.
उरुळी कांचनचे उपसरपंच सुनील कांचन यांनी दि. 25 जुनला राजीनामा दिला आहे. तर, सरपंच अश्‍विनी कांचन यांनी त्यांच्या विरुद्धच्या अविश्‍वास ठरावानंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडे आपील केले, त्यामुळे सध्या गावाला सरपंच आणि उपसरपंचपद नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही पदं नसताना ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांच्या सुचनांनुसार ग्रामपंचायतीचा कारभार गेली महिनाभर कसाबसा सुरू होता. परंतु, गावपातळीवरील प्रशासकीय कामे विस्कळीत होत असल्याने तसेच नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने ग्रामपंचातीवर प्रशासक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. 24 जुलै) ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कृष्णाजी धापटे यांची नेमणूक करण्यात आली. परंतु, लोकनेतृत्व नसल्याने काम करताना प्रशासकांना काही अडचणी येत आहेत. नागरी समस्यांबाबत नेमकी कोणाशी चर्चा करावी, कोणाकडून माहिती घ्यावी यासह अन्य अडचणींचा सामना प्रशासकांना करावा लागत आहे.

  • प्रशासक आणि ग्रामसेवकात समन्वय…
    उरूळीकांचनमध्ये सध्या मुलभुत समस्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावात अशुद्ध पाणी पुरवठा होत असून कचरा, वीज यासह प्रशासकीय कामेही महिनाभरापासून रेंगाळलेली आहेत. छोटी-छोटी कामे करतानाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अडचणी येत असून याकामी ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यात समन्वय ठेवीतच सध्या गावकारभार चालविला जात आहे.
  • गावातील समस्यांबाबत नागरिकांनी संपर्क करावा. प्रशासकीय अधिकारात जी कामे करण्यासारखी आहेत, ती करू. तातडीच्या समस्या वेळेत सोडविण्याकरिता प्रयत्न आहेत. नागरिकांनी केंव्हीही संपर्क साधावा.
    – कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी, उरूळीकांचन
  • नागरिकांनी कुठल्याही अडचणी प्रशासनापर्यंत घेवून याव्यात. त्या सोडविल्या जातील. याकामी सुजाण ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
    – कृष्णाजी धापटे, ग्रामपंचायत प्रशासक, उरूळीकांचन
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)