उरुळी कांचनमध्ये महिलांनी फडकावला ध्वज

कांचन-उरुळी कांचन परिसरात 70 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जय जवान जय किसान भारत माता की जय वंदे मातरम्‌ असे म्हणत साजरा करण्यात आला. उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण सरपंच राजश्री वनारसे, सारिका लोणारी, सारिका मुरकुटे, समता जगताप, अनिता बगाडे, ज्योती पाथरकरसह महिलांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, सुनील कांचन, उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विघालयाचे ध्वजारोहण मंडल अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले. या सुरेश कांचनसह मान्यवर उपस्थित होते. सरस्वती विघालयात 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, डॉ. रविंद्र भोळे डॉ अशोक पाटील कांतीलाल काळे सह मान्यवर उपस्थित होते.
टिळेकरमळा येथील शाळेला 42वर्षे पूर्ण झाल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस पाटील विजय टिळेकर, राजेंद्र टिळेकर, लीना शहा, भीमराव टिळेकरसह मान्यवर उपस्थित होते. बी. जे. शिर्के प्राथमिक विघालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माजी जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव कांचन, प्रतिभा कांचन, अजिंक्‍य कांचनसह मान्यवर उपस्थित होते.
सोरतापवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या सुनिता कड, अलका चौधरी, राणी गोरे, भारती चौधरी, स्वाती चौधरी, अलका हुड, शीतल चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सुदर्शन चौधरी, सागर चौधरी, आप्पासाहेब लोणकर, नानासाहेब चोरगे, गणेश चौधरी, अनिल लाड, बापूसाहेब लाड, दादासाहेब चौधरी, दत्तूनाना चौधरी, शेखर चौधरी, सहदेव सावंत, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, छत्रपती गायकवाड, वैभव चौधरी, अमोल चौधरीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन केले तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच सुदर्शन चौधरी यांनी शाळेतील चिमुकल्याला घेऊन केले. या वेळी कवायत लेझीम विविध प्रकारचे डान्स कोळी गीत तसेच देशभक्ती गाणी सादर केली.
कोरेगाव मूळ येथील कार्यालयात ध्वजारोहण सरपंच सविता काकडे यांनी केले. यावेळी उपसरपंच नारायण शिंदे, आदर्श सरपंच प्रमोद बोधे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुकिंदा काकडे, आप्पासाहेब शिंदेसह मान्यवर उपस्थित होते. भवरापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच मनिषा टिळेकर, पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकरसह मान्यवर उपस्थित होते.

  • साईन लॅंग्वेजमध्ये राष्ट्रगीत
    उरुळी कांचन येथील महावीर निवासी मूकबधीर विघालयाचे ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे सदस्य किर्ती कांचन व पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर यांनी केले. यावेळी शांताराम चौधरी, नीतिन छेडा, अमित कांचन, सविता कांचन, विजय बगाडे, प्रसाद कुंजीर, सरस्वती देवकर, शैला मोरे, बी. जे. तायडे, बाळकृष्ण काकडेंसह बाळासाहेब ताम्हाणे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी साईन लॅंग्वेजमध्ये राष्ट्रगीत सादर केले. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)