उमेदवार बेईमान असेल तर पाडा!

1977 मध्ये उत्तर प्रदेशातील बांसगांव लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकलेले फिरंगी प्रसाद आजही सायकल चालवताना दिसतात. आपल्या काळातील निवडणूक प्रचाराविषयी बोलताना ते नेहमी एक किस्सा आवर्जून सांगतात. एकदा चौधरी चरण सिंह त्यांच्या प्रचारासाठी आले होर्ते. चोरीचौरा रेल्वे स्टेशनसमोर त्यांची सभा होती. त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या फिरंगी प्रसाद यांचा हात पकडून त्यांना उभे केले आणि म्हणाले, माझा हा उमेदवार जर बेईमान असेल तर त्याला पराभूत करा.

हे वाक्‍य सांगूून फिरंगी प्रसाद म्हणतात की, त्यावेळचे नेते प्रचारामध्ये नैतिकता, इमानदारी आणि आदर्शांना सर्वाधिक महत्त्व देत होते. त्यांची निवडणुकीतील भाषणे अत्यंत संयमित आणि मर्यादांचे उल्लंघन न करणारी असायची. आजचा राजकीय ज्वर पाहिल्यास उमेदवार निवडून येण्यासाठी कोणत्याही स्तराला जाताना दिसतात.

चौधरी चरण सिंह यांच्या त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. त्यांनी फिरंगी प्रसाद यांना उभे राहण्यास सांगितले तेव्हा उपस्थितांमधूनच आवाज आला की त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. फिरंगी प्रसाद यांना त्या मतदारसंघात एकूण मतांपैकी 75 टक्‍के मते मिळाली होती. हा एक विक्रम मानला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.