उमेदवारी मिळताच आतिशी मारलेना यांनी बदलले आडनाव!

नवी दिल्ली – आपच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी लोकसभेची उमेदवारी मिळताच आपल्या आडनावात बदल केला आहे. आतिशी मारलेना यांचे आडनाव ख्रिश्‍चन वाटत असल्याने भाजपाकडून टीकेचा भडीमार होऊ शकतो. यामुळे आतिशी यांनी ट्‌विटर हॅंडलवरून आतिशी मारलेना या नावातले आडनाव वगळले आहे.

याबाबत आप पक्षाने खुलासा केला असून, आम्ही त्यांना आडनाव बदलण्यास सांगितलेले नाही किंवा त्यांच्यावर यासाठी कोणताही दबाव आणलेला नाही हे स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत आतिशी मारलेना म्हणाल्या, माझे मूळ आडनाव सिंग असे आहे. मात्र आता मी हा निर्णय घेतला आहे की मी आतिशी एवढेच नाव ट्‌विटरवर ठेवणार आहे. आतिशी मारलेना यांना आपने उमेदवारी जाहीर केल्यावर दिल्लीच्या पूर्व भागात ही अफवा पसरण्यास सुरूवात झाली की त्या विदेशी आहेत किंवा ख्रिश्‍चन आहेत. त्यांच्या एका निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार आतिशी यांच्या वडिलांचे नाव विजय सिंह आणि आईचे नाव तृप्ता आहे. मारलेना हे आडनाव त्यांना त्यांच्या आई वडिलांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)