उपसूचना मागे घेण्याची सत्ताधाऱ्यांवर दोनदा नामुष्की

पिंपरी – वायसीएम रुग्णालयातील मानधन तत्त्वावरील 53 डॉक्‍टरांना महापालिका सेवेत कायम करण्याच्या उपसूचनेबरोबरच डॉ. पंडित पद्माकर यांच्या सभागृहातील प्रवेशावरुन उपसूचनेवरुन भाजप नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर मिळाला. प्रसंगी न्यायालायात दाद मागण्याचा भाजप नगरसेवकांनीच इशारा दिल्याने सभागृहात मतदान घेणाची सूचना महापौरांनी मागे घेतली. या उपसूचनेला वाढता विरोध लक्षात घेत उपसूचना मागे घेण्याची सत्ताधारी भाजपवर दोनदा नामुष्की ओढविली. या वादात मूळ विषयदेखील तहकूब करावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यकारी अभियंता देवन्ना गट्‌टुवार यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव सभेच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता. त्याला नामदेव ढाके यांनी वायसीएमएच मधील मानधन तत्वावरील 53 डॉक्‍टरांना महापालिका सेवेत कायम करण्याबरोबरच अधिष्ठाता डॉ. पंडीत पद्माकर यांना कायम करण्याची उपसूचना दिली. त्यामुळे सभागृहातील वातावरणाचा नूरच पालटला. डॉ. पंडीत यांच्याविरोधातभाजपचे नगरसेवक आक्रमक झाले.

भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आगपाखड करतच या विषयावरील चर्चेला सुरुवात केली. डॉ. पंडित पद्माकर यांची महापालिकेतील प्रतिनियुक्‍तीची मुदत 17 फेब्रुवारीला संपली असताना ते स्थायी समिती सभेला कसे उपस्थित राहू शकतात. आजही त्यांची महापालिकेत लुडबूड सुरू आहे. कोणत्या अधिकारात ते सभेला आले आहेत. केवळ नगरसेवकांनाच नियम लागू आहेत का? अधिकाऱ्यांना नियम नाहीत का?अशा शब्दांत संताप व्यक्‍त केला.

भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नोकरभरतीमध्ये भूमीपूत्रांना डावलले जातअ सल्याची तक्रार करत, मानधनावरील डॉक्‍टरांना कायम करण्याची उपसुचना चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला.
या विषयावर मंगला कदम म्हणाल्या की, पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेस परवानगी मिळाल्यानंतर मानधनावरील डॉक्‍टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची सुपीक कल्पना कोणाच्या डोक्‍यातून आली. याच निकषावर घंटागाडी कर्मचारी, शिक्षण मंडळातील कंत्राटी कर्मचारी यांचादेखील विचार केला जावा. ते सर्व जण न्यायालयीन लढा देत आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यामुळे हा विषय मंजूर करायचा असल्यास सभागृहात मतदान घेण्याची मागणी केली.

सभागृह नेते एकनाथ पवार यांनी वायसीएममधील दुरावस्थेला राष्ट्रवादीलाच जबाबदार धरले. आजपर्यंत वायसीएममध्ये आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बसविले. आजही वायसीएममधील ठेके कोणाचे आहेत, याची माहिती घ्यावी. नगरसेवकांनी माहिती घेऊन सभागृहात बोलावे. डॉ. पंडित यांना मुदतवाढ देण्याऐवजी प्रशासन काय झोपले होते का? अशा शब्दांत प्रशासनावर टिका केली.

मतदानावर महापौरांचा “यू टर्न’
राष्ट्रवादीच्या आग्रही मागणीवरून या विषयावर महापौर राहुल जाधव यांनी मतदान घेण्याचे जाहिर केले. त्यानंतर भाजप व विरोधी नगरसेवकांची एकच पळापळ झाली. सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संदीप वाघेरे आशा शेंडगे यांनी पुन्हा बोलण्याची परवानगी मागत महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. गोंधळ होण्याची शक्‍यता दिसताच महापौर जाधव यांनी समन्वयाची भुमिका घेत मूळविषयच तहकूब केला. त्यामुळे उपसूचना मागे घेण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढविली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)