पुणे: उपचारात हलगर्जीपणा; रुग्णाचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रणजीत जगताप यांच्या रुग्णालयातील प्रकार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.23 – उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे एका ओपन हार्ट सर्जरीच्या रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना रसिकलाल एम. धारिवाल हार्ट केअर सेंटर येथे घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्‍टरांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. भैरवनाथ वसंत धालगडे (रा.भुम, जि.उस्मानाबाद) असे मृत रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सुनिता भैरवनाथ धालगडे (34) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती भैरवनाथ वसंत धालगुडे हे धारीवाल हॉस्पिटलमध्ये व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरीसाठी दाखल असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सीआरपीसी 174 अन्वये चौकशीत तसेच कागदपत्रांचे अवलोकन करता, रुग्णावर डॉक्‍टरांनी योग्य ते उपचार न करता तसेच हलगर्जीपणा केल्याने भैरवनाथ धालगडे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. ही शस्त्रक्रिया व उपचार दिनांक 12 ते 17 एप्रिल 2018 दरम्यान झाले होते.

फिर्यादीत सुनीता धालगडे यांनी म्हटले की, सांगली येथे न्यूमोनिआ झाला म्हणून पतीला दाखल केले होते. तेथे त्यांच्या ह्दयाच्या झडपेचा प्रॉब्लेम असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना पुण्यात आणण्यात आले. येथे डॉ.रणजित जगताप यांच्या धारिवाल रुग्णलयात दाखल करण्यात आले. त्यांनी व्हॉल्व रिप्सेलमेंटचा करावी लागेल असे सांगत ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला. तसेच पतीला आठ दिवसांत डिस्चार्ज मिळून ते नेहमीप्रमाणे वजन उचलू शकतील असे सांगितले. ऑपरेशनसाठी एकून तीन लाख भरले, मात्र ऑपरेशनमधील संभाव्य शस्त्रक्रीयेची माहिती दिली गेली नाही. शस्त्रक्रीयेदरम्यान आम्हाला आत जावू दिले नाही. आयसीयूमध्ये गेले असता पती शुध्दीवर नव्हती. तेथे पतीचा उजवा हात र्काटला बांधण्यासाठी दिराची सही घेण्यात आली. 14 एप्रिल 2018 ला ऑपरेशन झाल्यावर 17 एप्रिलला नर्सकडून ते मयत झाल्याचे कळाले. यासंदर्भात डॉक्‍टरांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, निट उत्तरे दिली गेली नाहीत. तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात डॉ.रणजीत जगताप, डॉ.आशिष खनिजे, डॉ.इब्राहीम पटेल, डॉ.मनिष फिरोदीया, डॉ.संग्राम घाटगे, डॉ.निलेश पलसदेवकर, डॉ.अनिरुध्द ढेकणे, डॉ.अमित जावा, डॉ.स्वप्नील कर्णे, डॉ.एस.रानडे, डॉ.धार्यशिल कणसे यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.

शारिरीक गुंतागुंत झाल्याने मृत्यू
रसिकलाल एम. धारिवाल हार्ट केअर सेंटरचे प्रमुख व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रणजीत जगताप यांच्याशी दैनिक “प्रभात’ने संपर्क साधला असता, रुग्णाची ओपन हार्ट शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर काही शारिरीक गुंतागुंत निर्माण झाली. रुग्णावर जवळपास सात ते आठ तज्ज्ञ डॉक्‍टरांनी उपचार केले. मात्र, त्यानंतर गुंतागुंत वाढत गेल्याने शस्त्रक्रियेनंतर तीसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)