उन्हाळ्यात सांभाळा चेहरा…

प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या चेहऱ्यात असते. सुंदर चेहरा हा निसर्गाची देणगी असली तरी त्याची निगा आपल्या हाती आहे. चेहऱ्याची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. सुंदर, टवटवीत, तजेलदार चेहरा राखण्यासाठी हे करा….

चेहऱ्याला बदाम खसखस आणि चंदन यांचा लेप लावून पाच मिनिटे ठेवून धुवावे. लाल भोपळ्याचा गर चेहऱ्याला लावा. चेहरा उजळेल. अंड्याचा पिवळा बलक फेसून त्यात गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा. चेहरा उजळतो. कोबीचा रस काढून चेहऱ्याला लावल्यास चेहरा एकदम तजेलदार दिसतो.बदामाचं तेल आणि मध एकत्र मिसळा. हलक्‍या हातानं सबंध चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने पुसून टाका. चेहरा टवटवीत दिसतो.

पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्यात एरंडेल तेल आणि हळद घाला. मिक्‍सरमधून काढा आणि चेहऱ्यावर त्याचा लेप लावा. 20 मिनिटे ठेवा. धुवा. चेहरा एकदम ताजातवाना दिसेल.जायफळाचे चूर्ण व आंबेहळद पाण्यात भिजवून रात्री चेहऱ्याला लावावे. सकाळी उठल्यावर चेहरा धुवावा. चेहरा तर फ्रेश होतोच शिवाय मुरमेही जातात.चेहऱ्यावरील काळे डाग देण्यासाठी मुळ्याचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करून लावावा.

उन्हात जाण्यापूर्वी पोटभर पाणी प्यावे. त्यामुळे शरीरात थंडावा राहतो.
दुधाची साय, लिंबूरस व हळद यांचा लेप रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावावा.
कच्या दुधात लिंबाचा रस घालून चेहऱ्यावर लावावा. 5 मिनिटांनंतर कापसाने पूसून घ्यावा. चेहरा स्वच्छ होतो. उन्हाने काळवंडलेल्या त्वचेवर व्हिनिगर व ऑलिव्ह ऑईल यांचे मिश्रण लावावे. चेहरा उजळतो. ऊन, घाम यांच्या संयुक्त परिणाम होऊ नये म्हणून व चेहऱ्याला गारवा देण्यासाठी वारंवार गार पाण्यात 1 चिमूट त्रिफळा सत्व घालून चेहऱ्यावर शिपके मारावेत.

तिखट, मसाल्याचे व तेलकट पदार्थ, चॉकलेट खाणे टाळावे. खूप घाम येत असेल तेव्हा पाण्यात संत्र्याची साल अथवा ओडीकोलोन टाकून अंघोळ केल्याने फ्रेश वाटते व घामाची दुर्गंधी कमी होते. रोज शहाळ्याचं पाणी प्यावे व या पाण्याने चेहरा धुवावा. सावळा रंग उजळ होण्यासाठी मध + चुन्याची निवळी 15 ते 20 मिनिटे रोज लावावे व कोमट पाण्याने चेहरा धुवावा. उन्हामुळे चेहरा काळवंडतो त्यावेळी जायफळ दुधात उगाळून त्याचा घट्ट लेप अर्धा तास लावावा. चेहरा उजळतो.

फाऊंडेशन वापरताना गव्हाळ रंगाला बेज, काळ्या रंगाला टॅन व गोऱ्या रंगाला क्रीम म्हणजे एक रंगी डार्कर फाऊंडेशन लावावे. मेकप 4 ते 5 तासांच्यावर ठेवू नये. क्‍लिंझींगने सर्व मेकप पुसून काढावा. सावळा रंग उजळ दिसण्यासाठी वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर + दही किंवा कच्चे दूध+ बेसनपीठ रोज अर्धा तास लावावे. थंड पाण्याने चेहरा धुवावा.

पपई, खरबूज, टरबूज, केळी, दूधी भोपळ्याच्या बिया, पुदिन्याची पाने यापैकी कशाचाही गर काढून चेहऱ्याला लावल्यास चेहरा टवटवीत दिसतो. मक्‍याचे पीठ + चंदन पावडर + लिंबाचा रस यांचे मिश्रण लावावे.चेहऱ्यावर रोज बर्फ फिरवावा. रोज सकाळी व संध्याकाळी गार पाण्याचे साधारण तीस चाळीस शिपके चेहऱ्यावर मारावेत व तोंडात पाणी भरून जेवढे फुगवता येईल तेवढे तोंड फुगवावे. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा तजेलदार दिसते. (वॉटर मसाज होतो.)

पुदिन्याचा रस चेहऱ्यावर लावा व 30 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतील. तसेच काळसर चेहरा उजळ होण्यास मदत होईल. पालकाची भाजी चिरून उकळा व पिळून काढा सर्जिकल कॉटनने हे पाणी चेहरा व मानेला लावा. पंधरा मिनिटांनी धुवून टाका.

मुळा किसून त्याचा रस काढा. त्यात सम प्रमाणात लोणी मिसळून हे मिश्रण सुरकुत्या असणाऱ्या चेहऱ्यावर व मानेवर लावा. एका तासानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

सुजाता गानू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)