उन्हाळ्यात फुलवली झेंडूच्या फुलांची बाग

टाकवे बुद्रुक (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील देवले गावातील शेतकरी जयराम कडू व नीता कडू कुटुंबातील सदस्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत एक आधुनिक बाग तयार करुन त्यामध्ये झेंडूच्या फुलांची निर्मिती केली. या बागेला लागणारे पाणी हे घरगुती कामासाठी वापरलेले पाणी हे त्यांनी बागेला वापरले आहे. तसेच घरातील ओला कचऱ्यापासून त्यांनी सेंद्रिय खंताचा निर्मिती करून या खतांचा जास्त प्रमाणात वापर करुन त्यांनी ही बाग फुलवली आहे.

तसेच त्यामध्ये जोड धंदा म्हणून हिरव्या मिरची लागवड त्यांनी केली आहे. विशेष या बागेतील फुले येथील कार्ला एकवीरा देवीच्या मंदिरात देवीची पूजा करण्यासाठी या फुलांना बाजारपेठत मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. इच्छा असेल तर माणूस दुष्काळावर मात करू शकतो. या पुढील काळात शेती शिवाय पर्याय नसून सर्वांनीच या कडू कुटुंबाचा आदर्श नक्की घ्यावा व तसेच या नवीन पिढीने शेतीकडे वळावे. जास्तीत जास्त आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करावा, अशी माहिती प्रगशील शेतकरी जयराज कडू यांनी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)