उन्हाळी पिकांची घ्यावयाची काळजी (भाग दोन ) 

भेंडीवाढ – भेंडी पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास त्यासाठी इमिडाक्‍लोप्रिड 4 मिली किंवा थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. फळ पोखरणारी अळी – फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी किडकी फळे तोडून खड्डयात पुरावीत. त्यानंतर डेल्टामेथ्रीन 2.8 ईसी 8 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साध्या हात पंपाने फवारावे. अधून-मधून 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

लसूण काढणी – लसूण पिकाची काढणी केल्यानंतर तो लसूण साठवण गृहात रिंग पद्धतीने हवा खेळती राहील अशा रितीने साठवावा. सध्या काही शेतकरी शेडोटमध्ये नियंत्रीत वातावरणामध्ये भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यामध्ये विशेष करुन ढोबळी मिरची, टोमॅटो व काकडी यासारख्या फळभाज्या व कोथिंबीर, मेथी यासारख्या पालेभाज्यांची लागवड केली जाते. सदरहू शेडमध्ये रस शोषणाऱ्या किडींचा उदा. मावा, फुलकिडे, पांढरी माशी व कोळी ह्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे विषाणूजन्य, बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोग वाढू शकतात.

 मुरडा हा विषाणूजन्य रोग टोमॅटो व मिरची पिकावर पांढरी माशी व तसेच फुलकिडे या किडींमार्फत होऊ शकतो. यामध्ये पिकांची पाने बारीक वाकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी निस्तेजा दिसतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. नियंत्रण – 1. शेडनेटमध्ये आवश्‍यकतेनुसार पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळे व तसेच फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे वापरावेत. 2. शेडनेटमध्ये रासायनिक किडनाशकांचा वापर करावयाचा झाल्यास (पुढीलप्रमाणे 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी.) 3. पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमेथोएट (30 ईसी) 15 मिली किंवा डायफोथियुरॉन (50 डब्लू.पी.) 12 ग्रॅम किंवा फोप्रोपॅथ्रीन (30 ईसी) 5 मिली यापैकी औषधाची फवारणी करावी.

फुलकिडे नियंत्रणासाठी फिप्रोनील (5ईसी) 15 मिली किंवा स्पायानेसॅड (45 ईसी) 4 मिली यापैकी औषधाची फवारणी करावी. मोझॅकया विषाणूजन्य रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे होतो. पाने फिक्कट हिरवी होतात, पाने बारीक राहून त्यामध्ये हिरवट, पिवळसर डाग पडतात. झाडांची वाढ खुंटते, फुले फळे फार कमी प्रमाणात लागतात. नियंत्रण: आवश्‍यकतेनुसार इमिडाक्‍लोप्रिड (17.8 एस.एल.) 4 मिली किंवा डायमेथोएट (30 ईसी) 15 मिली (वरील चुरडा-मुरडा व तसेच मोझॅक रोगाचे नियंत्रणासाठी दोन फवारण्यांमध्ये कडूनिंबावर आधारीत ऍझाडीरेक्‍टीन (10,000 पी.पी.एम.) 20 मिली किंवा 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी) कोळीशेडनेटमध्ये जास्त तापमान वाढू लागल्यास कोळी ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. नियंत्रण : फेनाक्‍झाक्विन (10 ईसी) 25 मिली किंवा फेनपारॉक्‍झीमेट (5 एस.सी.) 10 मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन (30 ईसी) 5 मिली यापैकी गरजेनुसार फवारणी करावी.

भुरी – भाजीपाला पिकांच्या पानांच्या खालच्या बाजूला पिठासारखी बुरशी वाढते आणि नंतर ती खालच्या बाजूला पसरते. पाने पिवळी पडून गळून पडतात, फुलांची निर्मिती पूर्णपणे बंद होते. रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारावीत.

पशुधन व्यवस्थापन – उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी कुक्कुटपालनाच्या शेडला बाहेरुन पांढरा रंग द्यावा. त्यामुळे सुर्यप्रकाश परावर्तीत होऊन शेडचे तापमान कमी होण्यास मदत होईल. पक्ष्यांसाठी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या पाण्यात 0.25 टक्के मीठ मिसळावे. त्यामुळे पक्षी पाणी जास्त पितात.

     प्रमुख अन्वेषक 
ग्रामीण कृषि मौसम सेवा तथा 
प्रमुख कृषि विद्या विभाग, म.फु.कृ.वि. राहुरी.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)