उन्हाळा आणि डोळ्यांची निगा (भाग दोन )

  सुजाता गानू

  सुर्योदय व सुर्यास्त पहावा 

बहुतांश लोकांना आपल्या डोळ्यांचं महत्त्व समजतं. महत्त्व कळत असलं तरी कित्येकांना डोळ्यांचं आरोग्य कसं राखायचं याची कल्पना नसते. जी माणसं दृष्टिहीन आहेत त्यांना विचारा डोळ्यांचं महत्त्व किती असतं ते. म्हणूनच आपल्याला असलेल्या  डोळ्यांची काळजी आपण वेळीच घेतली तर नंतर नुकसान होणार नाही. त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. आता तर दिवसेंदिवस उष्णता वाढत जात आहे. त्या दिवसांत डोळ्यांचे विविध आजार बळावतात. म्हणूनच आपण आपल्या डोळ्यांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊया.

कित्येकांना रात्री वाचनाची सवय असते. कमी प्रकाशात किंवा अगदी प्रखर उजेडात वाचणं टाळावंच. तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकावर थेट प्रकाश पडेल, असा प्रकाश खोलीत असला पहिजे.टीव्ही पाहाण्यामुळे डोळ्यांना भिंगाचा चष्मा लागतो हे आपल्याला ठाऊकच आहे. म्हणूनच टीव्ही पाहताना किमान झ फूट लांब बसावं.ट्रेनमधून किंवा बसमधून प्रवास करताना वाचन टाळावं. ट्रेन किंवा बसच्या हलण्यामुळे आपल्या डोळ्यांसमोरील अक्षरं हलतात त्याचा त्रास आपल्या डोळ्यांना होतो. त्याचप्रमाणे झोपूनही काही वाचू नये. अधिक वेळ टीव्ही पाहू नये किंवा कॉम्प्युटर गेम्स खेळू नये.

आपल्या कुटुंबातील लोकांना काही डोळ्यांचे आजार अथवा काही त्रास होत असल्यास त्याची माहिती स्वत:ला करून घ्यावी. त्याबाबत त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करा. तसंच आजारावर किंवा त्रासावर उपचार झाले आहेत की नाही अथवा कोणते अनुवंशिक आजार आहेत का याचीही खात्री करून घ्यावी.

तुमच्या दृष्टीतला दोष कमी होईल, असा आहार घ्यावा. गाजर डोळ्यांसाठी उत्तम आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र त्याचबरोबर ताजी फळं आणि भाज्यांचाही आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या त्यातही पालक, ब्रोकोली अशा भाज्यांचा समावेश करावा. वजन योग्य राखा. कारण अतिरिक्त वजनामुळे तुम्हाला मधूमेह किंवा अन्य कोणतेही आजार होण्याची शक्‍यता असते. याचा परिणाम तुमच्या दृष्टीवरही होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे ग्लुकोमासारखे आजार होण्याची शक्‍यता असते. तुम्हाला वजन कमी करणं शक्‍य नसेल तर तुमच्या डॉक्‍टरांशी बोला.

घरात वावरताना किंवा खेळताना सुरक्षित काचेचा चष्मा किंवा गॉगल वापरा. बहुतांश काचा या पॉलीकाबरेनेटपासून तयार झालेल्या असाव्यात म्हणजे त्या प्लास्टिकच्या काचांपेक्षा दहा पट अधिक चांगल्या असतात. अशा काचांमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. म्हणून काच निवडताना काळजी घ्यावी.तुमच्या शरीरासाठी धूम्रपान जसं हानिकारक आहे, तसंच ते डोळ्यांसाठीही आहे. म्हणून धूम्रपान टाळा. वयोमानामुळे होणारे डोळ्यांचे आजार धूम्रपानामुळे वयाच्या आधीच होतात. आजकाल गॉगल घालणं ही मोठी फॅशनची गोष्ट असते. पण त्यांचं मुख्य काम हे डोळ्यांची काळजी घेणं हे आहे. म्हणून फॅशनपेक्षा तुमच्या डोळ्यांना खरोखरच आराम मिळेल याची काळजी घ्या. अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण होईल असे गॉगल निवडा.

डोळ्यांना काही वेळ आराम द्या. कॉम्प्युटर किंवा एकाच जागी खूप वेळ बघत बसतो. अशा वेळी आपण डोळे मधूनच उघड-बंद करायचं विसरतो. दर वीस मिनिटांनी 20-20-20चा नियम पाळा. दर वीस मिनिटांनी तुमच्यापासून आजूबाजूला वीस फुटाच्या अंतरावर असलेल्या गोष्टींकडे वीस सेकंद पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो. लेन्स लावताना हात स्वच्छ धुवावेत. कोणत्याही प्रकारचा संसर्ग डोळ्यांना होऊ नये म्हणून डोळ्यात लेन्स घालताना आणि काढताना हात स्वच्छ साबणाने धुवावेत. तसंच खराब झालेल्या लेन्स त्वरित बदलाव्यात.वर्षातून एकदा डोळे तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत.डोळे लाल झाल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवावेत. तसंच डोळे लाल झाले असतील तर डोळ्यांत मुळीच लेन्स घालू नये. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याखेरीज डोळ्यात कोणत्याही प्रकारचं औषध घालू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)