उन्हामुळे मतमोजणी केंद्राबाहेरील गर्दी ओसरली

पिंपरी – मतमोजणीमुळे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सुर्य आग ओकत आहे. परिणामी मतमोजणी केंद्राबाहेरील उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी ओसरली आहे.

मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. त्यावेळी उमेदवारांच्या समर्थकांची बऱ्यापैकी गर्दी होती. उन्हाचा पारा चढताच गर्दी ओसरायला सुरूवात झाली आहे. वाहनांमध्ये एसी लावून कार्यकर्ते बसले आहेत. काहींनी मिळेल तेथे सावलीचा आसरा घेतला आहे. काहींनी काढता पाय घेणे पसंत केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.