उद्रेक होण्यापूर्वी निर्णय घ्या

मराठा समाजाचा अल्टिमेटम : फलटणला पाचव्या दिवशीही आंदोलन

फलटण, दि. ÷ (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाच्या वतीने अधिकार गृहासमोर बसलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी धोंड्याचे पूजन करून दुग्धभिषेक व गाजर वाटप करून आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी राज्य शासनाची राहील, असा अल्टीमेटम देण्यात आला
फलटण येथील अधिकार गृहासमोर गेली पाच दिवस मराठा समाजाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारे फडणवीस सरकारला जाग येण्यासाठी गेली पाच दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. पाचव्या दिवशी धोंड्याचे पूजन व दुग्धभिषेक करण्यात आला. तसेच सरकारच्या वेळकाढूपणामुळे गाजर वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाची सहनशीलता सुटत चालली असून लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आरक्षणाबाबत फडणवीस सरकार गोड बोलत गोल-गोल घुमवत आहे. मराठा नेत्यांना आमिषे दाखवून समाजाला फसवत आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 9ऑगस्टपर्यंत घेऊन त्याच दिवशी सर्व बाबींची पूर्तता करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा सरकार उलथवून टाकण्याचे काम मराठा समाज करेल व ज्या मराठा समाजाच्या जीवावर हे राज्य करत आहेत, त्यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नसल्याचा अल्टिमेटम आंदोलनादरम्यान देण्यात आला. दरम्यान, बार असोसिएशनच्या पदाधिकारी वकिलांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलनास पाठिंबा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)